शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

महाराजबागेच्या बचावासाठी सरसावले राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 20:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ३ डिसेंबरला महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा मेल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी ...

ठळक मुद्देकृषी विद्यापीठावर हल्लाबोलसामाजिक संघटनाही झाल्या अग्रेसरनागरिकांनीही व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ३ डिसेंबरला महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा मेल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविला. यानंतर नागपूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या. महाराजबागेशी निगडित असलेल्या सामाजिक संघटनांनी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. ज्याच्या त्याच्या तोंडातून महाराजबाग बंद होऊ नये, असे वक्तव्य येऊ लागले. शासन, विद्यापीठ यांच्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. महाराजबागेच्या बचावासाठी आता राजकीय पक्षही सरसावल्याने महाराजबागेच्या आंदोलनाला बळ मिळाले आहे. नागपूरकरांकडूनही या आंदोलनाला समर्थन मिळत आहे.महाराजबाग बंद होऊ देणार नाही - शिवसेनानागपूरचे हृदय असलेले, १२५ वर्षे जुने महाराजबाग प्राणिसंग्रहालय कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिला.महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रद्द केल्याने नागपूरकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे़ शुक्रवारी दुपारी शेकडो शिवसैनिकांनी कृषी विद्यापीठावर धावा बोलत, महाराजबागेजवळ तीव्र निदर्शने केली़ ‘शिवसेनेची एकच पुकार, नही बंद होने देंगे महाराजबाग’, ‘महाराजबाग बेचने वालो को जुते मारो सालो को’, अशा घोषणा देऊन महाराजबाग परिसर दुमदुमुन टाकला होता़. प्राणिसंग्रहालयातून हा मोर्चा थेट पंजाबराव कृषी विद्यापीठात शिरला़ कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रक डॉ़ एऩ डी़ पालार्वार यांना खाली बोलवा, असा इशारा शिवसैनिकांनी प्रशासनाला दिला़ त्यानंतर, पोलिसांच्या मध्यस्थीने पालार्वार यांनी भेट घेतली़ प्रकाश जाधव यांनी, प्राणिसंग्रहालय बंद करण्यामागे राजकीय षडयंत्र आहे का, प्राणिसंग्रहालयासाठी केंद्र सरकारकडे कितीवेळा पाठपुरावा केला, प्राधिकरणाने सुचविलेल्या अटींची पूर्तता का केली नाही, असा सवाल करीत याकरिता विद्यापीठच जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश जाधव यांनी केला़याप्रसंगी शिवसेनेचे सूरज गोजे, नितीन तिवारी, गुड्डू रहांगडाले, रवनीश पांडे, राजू तुमसरे, हितेश यादव, समीर पालकर, गजानन आकरे, नत्थूलाल दारोटे, रमेश मोरे, किशोर राठोड, प्रवीण दिकोंडवार, नितीन साळवे, मुन्ना शुक्ला, रजत देशमुख, विकास आंबोरे, राम कुकडे, दिगंबर ठाकरे, मनोज शाहू, पुरुषोत्तम कांद्रीकर, दीपक काळपांडे, विक्रम राठोड, अश्रय मेश्राम यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते़या आंदोलन महाराजबाग आरोग्य आसन मंडळाचे अ‍ॅड. प्रमोद नरड, राजेश जरहगर, साबीर खान, निरंजन बिसने, बिपीन ठाकूर, टी.एन. वैद्य, अरुण मोरे, सुरेश हेडाऊ, रमेश मोरे, विनोद जाधव, आशिष चौरसिया, किशोर राठोड, नितीन साळवे, शामराव इरपाते, रवी हारगुडे, किशोर ठाकरे, मनीष सराफ यांनीही समर्थन दिले होते.तर आम्ही जावे कुठे? - युवक काँग्रेसचा सवाल 

महाराजबागेच्या बचावासाठी युवक काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वन्यप्राण्यांचे मुखवटे लावून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराजबाग परिसरात आंदोलन करीत, सांगा आम्ही जावे कुठे? असा सवाल महाराजबाग प्रशासनाला केला. कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड घोषणाबाजी देत, महाराजबागेच्या बचावासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा संकल्प केला. ‘नही चलेंगी नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी’ अशा घोषणा सरकार आणि महाराजबाग प्रशासनाच्या विरोधात दिल्या. नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी युवक काँग्रेसचे महेश बालपांडे, आकाश गुजर, रोनाल्ड मेश्राम, जॉन अगस्टिन, वसिम खान, हिमांशू मेश्राम, अधिकांश मेश्राम, शाहीद खान, फजलूर रेहमान कुरेशी, अजहर शेख, आकाश चौरीया, तुषार मदने, निखिल कापसे, तनवीर अहमद विद्रोही, तौसिफ खान उपस्थित होते.मुळात महाराजबागेची जागा ही शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्या जागेवर सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे वारंवार महाराजबागेला कुठल्या तरी माध्यमातून कचाट्यात पकडण्याचे काम प्रशासन करीत आहे. महाराजबाग हे पर्यावरण संतुलनाचे केंद्र आहे. शहराच्या मध्यभागी आहे. हे निव्वळ मनोरंजनाचे केंद्र नसून, आजच्या शहरी विद्यार्थ्यांना निसर्गाचा वन्य जीवांचा अनुभव करून देणारे केंद्र आहे. त्याची निगा राखल्या गेली पाहिजे.हरीश धुरट, कामगार नेतेमहाराज बाग ही नागपूरची शान आहे. पण जी यंत्रणा महाराज बागेला संचालित करते, त्या यंत्रणेने गांभीर्याने महाराज बागेकडे बघितलेच नाही. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्यांच्या निकषात जे बसत नाही, त्यावर बोट दाखवून मान्यता रद्द केली आहे. मुळात जबाबदारी स्वीकारणाऱ्यांनीच त्याला गांभीर्याने घेतले असते, तर ही वेळ आली नसती.अशोक मोखा, सदस्य, लोकमत एडिटोरियल बोर्डविकासाच्या नावावर इतिहास पुसल्या जाऊ नये. ज्या इतिहासामुळे पिढी घडते, नीतीमूल्याची जोपासना केली जाते, त्याचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सरकारद्वारे होत आहे. महाराजबागेने आपल्याला व आजच्या विद्यार्थ्यांना निसर्गावर प्रेम करा, पशुपक्ष्यांवर प्रेम करा शिकविले आहे. आज शहरातील विद्यार्थी निसर्गापासून दूर झाले आहे. त्यांना महाराजबागेत वन्य प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती बघायला मिळतात. त्यांचे एक वेगळे आकर्षण मुलांमध्ये आहे. त्यामुळे या वास्तूचा बळी जाऊ नये, हे समाजाचे संस्कार केंद्र आहे.भाऊ दायदार, माजी संचालक, राष्ट्रीय सेवा योजनामहाराजबागेला मान्यता देणारे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आहे आणि मान्यता रद्द करणारेही तेच प्राधिकरण आहे. ज्या निकषामुळे महाराजबागेची मान्यता रद्द केली गेली, त्यासाठी केंद्रीय प्राधिकरणाचीच चुकी आहे. २०११ ला डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाक डून मास्टर प्लॅन पाठविला होता. तो दोनवेळा दुरुस्तही करण्यात आला. सुनावणीही झाली. मास्टर प्लॅनला मंजुरी न देता थेट मान्यता रद्द करणे हे चुकीचे आहे. प्राधिकरणाने पहिले मान्यता द्यायला हवी होती. नूतनीकरणासाठी संधी द्यायला हवी होती. त्यानंतर जर विद्यापीठाकडून काहीच झाले नसते तर मान्यता रद्द करणे योग्य होते.विजय सालनकर, सदस्य, लोकमत अ‍ॅडव्हायझरी बोर्ड

 

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरagitationआंदोलन