शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नागपुरात राजकीय पक्ष काढताहेत एकमेकांची लाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:48 IST

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमधून अ‍ॅन्टी प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाच्या सभांमधून सुद्धा एकमेकांविरुद्ध गरळ ओकली जात आहे. आता शहरात सुद्धा पोस्टरबाजीतून एकमेकांची लाज काढली जात आहे. काँग्रेस आणि भाजपाचे पोस्टर वॉर चांगलेच पेटले आहे. पण या अ‍ॅन्टी प्रचाराला मतदार साद घालतील का ? हा चिंतनाचा विषय आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस-भाजपामध्ये पोस्टर वॉर : अ‍ॅन्टी प्रचारावर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमधून अ‍ॅन्टी प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाच्या सभांमधून सुद्धा एकमेकांविरुद्ध गरळ ओकली जात आहे. आता शहरात सुद्धा पोस्टरबाजीतून एकमेकांची लाज काढली जात आहे. काँग्रेस आणि भाजपाचे पोस्टर वॉर चांगलेच पेटले आहे. पण या अ‍ॅन्टी प्रचाराला मतदार साद घालतील का ? हा चिंतनाचा विषय आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवर काँग्रेसने मोठमोठे पोस्टर्स लावून ‘लाज कशी वाटत नाही?’ असे भाजपाला उद्देशून पोस्टर्स लावले आहे. जीएसटी, नोटाबंदी, महागाई, बेरोजगारीवर भाजपाची पोस्टर्सच्या माध्यमातून चांगलीच मुस्कटदाबी केली आहे. ‘नोटबंदी आणि जीवघेणी जीएसटी लादून देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या तुघलकी सरकारला’, ‘महागाईने सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या सरकारला’, ‘सुशिक्षित तरुणांना पकोडे तळायला’ लाज कशी वाटत नाही? असा सवाल काँग्रेसने केला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी अशा आशयाचे पोस्टर्स काँग्रेसने लावून भाजप सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत.काँग्रेसने सुरू केलेल्या या पोस्टरबाजीला भाजपाने सुद्धा प्रत्युत्तर देताना तगडी तयारी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या पोस्टर्सपासून काही अंतरावरच भाजपाचे ‘हो लाज वाटते, पण काँग्रेसची’ अशा आशयाचे पोस्टर्स शहरात झळकत आहे. पण भाजपाने काँग्रेसवर टीका करताना, भाजपाच्या कामाचाही आढावा यात घेतला आहे. भाजपाच्या पोस्टर्सवर ‘हो लाज वाटते, पण काँग्रेस सरकारची, ६० वर्ष राज्य करणाऱ्या कमिशनखोर सरकारची’, ‘६० वर्षे राज्य करणाऱ्या भ्रष्ट नाकर्त्या सरकारची’ असा टोलासुद्धा लगावला आहे. सोबतच आपल्या सरकारचे गुणगान सुद्धा केले आहे. मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, स्वच्छता अभियान, उजाला अभियान याची यशस्वीता आणि विकास कामांचा संदर्भ सुद्धा पोस्टर्समधून दिला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध नोटाबंदी हा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक होता, असा अभिमान भाजपाच्या पोस्टर्समधून झळकत आहे.सामान्य नागरिकांच्या फोटोचा वापर करून, जनतेच्या भावनांना यातून हात घातला आहे. राजकीय पक्षांची ही पोस्टरबाजी सामान्यांसाठी मनोरंजनात्मक ठरत आहे. अ‍ॅन्टी प्रचाराचा हा फंडा मतदारांवर किती प्रभावी ठरेल? हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019