शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेनंतर राजकीय वातावरण टाईट; पश्चिम, उत्तर काँग्रेसला पोषक, दक्षिण ‘टफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 10:44 IST

चार सदस्यीय प्रभाग रद्द करीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता प्रत्यक्ष प्रभाग रचना झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

ठळक मुद्देदक्षिण-पश्चिममध्ये भाजपचा पाया मजबूत

कमलेश वानखेडे

नागपूर : चार सदस्यीय प्रभाग रद्द करीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता प्रत्यक्ष प्रभाग रचना झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या नव्या रचनेमुळे पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर मतदारसंघात काँग्रेसला फायदा होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपुरात भाजपचा गड अधिक मजबूत होईल. दक्षिण नागपुरात भाजपसमोर तर मध्य नागपुरात काँग्रेससमोर तगडे आव्हान असेल, असे प्राथमिक चित्र आहे.

पश्चिम नागपुरात एकूण २४ नगरसेवक होते. आता ते २५ राहतील. सद्यस्थितीत पश्चिम नागपुरात काँग्रेसचे सात नगरसेवक होते. त्यापैकी गार्गीचोपडा यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचा हात धरला. भाजपचे १७ नगरसेवक आहेत. नव्या प्रभाग रचनेनंतर प्रभाग १६, १७, २१ मध्ये काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे. १८, १९, २० मध्ये भाजपला तगडी टक्कर मिळेल.

प्रभाग ३६ मध्ये दबदबा कायम राहील तर प्रभाग ३७ मध्येही टफ फाईट होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. उत्तर नागपुरात २४ पैकी काँग्रेसचे ७, बसपाचे १० तर भाजपचे ७ नगरसेवक आहे. प्रभाग २, ३, १४, १५ या प्रभागांमध्ये काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. प्रभाग १, ४, १० मध्ये भाजपला झुकते माप मिळेल, असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते बसपालाही या रचनेचा फायदा होईल.

दक्षिण-पश्चिममध्ये २४ पैकी भाजपचे २१ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत या प्रभागातील नगरसेवकांची संख्या वाढून एकूण २७ झाली आहे, तर प्रभागात जवळपास ७० टक्के जुना भाग कायम आहे. प्रभाग ३५, ३६, ३९, ४०, ४१, ५२ हे भाजपचे गड आणखी पक्के होतील, असे मानले जात आहे. तर प्रभाग ३८ मध्ये काँग्रेस पुन्हा वरचढ ठरेल. प्रभाग ४२ मध्ये टफ फाईट होईल, असा अंदाज आहे.

पूर्व नागपुरात एकूण २८ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत २ ने वाढून ३० झाले आहेत. सध्या भाजपचे २४ नगरसेवक, काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीचे एक नगरसेवक आहेत. नव्या रचनेत प्रभागात ४० टक्के बदल झाला आहे. मात्र, या बदलाने नुकसान होणार नाही, असा भाजपचा दावा आहे.

दक्षिणमध्ये मामला टफ

- दक्षिण नागपुरात एकूण २५ नगरसेवक आहेत. भाजपचे २१ तर काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी २ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून एकूण १० प्रभाग झाले आहेत. येथून २८ नगरसेवक राहतील. गेल्या निवडणुकीत भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये ‘टफ फाईट’असे चित्र आहे. काँग्रेससमोर बसपाचे मोठे आव्हान असेल. शिवसेनेच्या नेत्यांचा अधिक कस लागेल, असे प्राथमिक चित्र आहे.

मध्य नागपुरात भाजप जोशात

- मध्य नागपुरात एकूण २३ नगरसेवक आहेत. सद्यस्थितीत भाजपचे १६ तर काँग्रेसचे ६ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत बहुतांश प्रभागात २० ते २५ टक्केच टक्केच बदल झाला आहे. मोमिनपुराची दोन भागात विभागणी झाली असून प्रभाग २४ हा पूर्णपणे नवा प्रभाग तयार झाला आहे. प्रभाग क्रमांक १२, २२, २४, २५ मध्ये भाजप मुसंडी घेईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक