शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाचा झाला आरोपी; वर्षभरात पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:37 IST

अनेक वर्षे परिश्रम करून तो अखेर गेल्या वर्षी पोलीस बनला. त्याची कारागृहात रक्षक म्हणून निवड झाली. मात्र, पोलीस बनण्यासाठी त्याने गैरप्रकार केला. एक वर्ष होत नाही तो त्याची बनवाबनवी उघड झाली.

ठळक मुद्दे शैक्षणिक कागदपत्रात फेरफारबजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्षे परिश्रम करून तो अखेर गेल्या वर्षी पोलीस बनला. त्याची कारागृहात रक्षक म्हणून निवड झाली. मात्र, पोलीस बनण्यासाठी त्याने गैरप्रकार केला. एक वर्ष होत नाही तो त्याची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे त्याला आता कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. कैलास प्रकाश बगडे असे त्याचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील पडेगाव येथील रहिवासी आहे.जून २०१७ मध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलाने घेतलेल्या पोलीस भरतीत कैलास बगडे याने सहभाग घेतला होता. मूळ शैक्षणिक कागदपत्रांसोबतच त्याने खेळाडूसाठी असलेल्या राखीव जागेसाठी फुटबॉल खेळातील प्रावीण्य प्रमाणपत्रही सादर केले होते. त्यानुसार, त्याची कारागृह पोलीस शिपाई म्हणून ९ जून २०१७ ला निवड झाली. तो रुजूही झाला. त्याने सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा संबंधित विभागाकडून सुरू झाली. त्याने सादर केलेले अ‍ॅम्युचुअर रब्बी फुटबॉल असोसिशन आॅफ महाराष्ट्र तसे सहायक संचालक क्रीडा व युवक सेवा महाराज्य पुणे यांच्याकडून पडताळणी अहवाल नुकताच कारागृह प्रशासनाला मिळाला.

अन् भांडे फुटलेबगडेने सादर केलेले प्रमाणपत्र तसेच संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्याने त्या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी केल्याचेही उघड झाले. त्यामुळे भुमेश्वर जागोजी लोहकर (वय ४९, रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत) यांनी तसा तक्रार अर्ज बजाजनगर पोलिसांकडे दिला. पोलिसांनी चौकशी करून बगडेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बगडे याला अटक झाली की नाही, ते बजाजनगर पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी