शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'हमसे क्या भूल हुई', अनेकांचा प्रश्न; पोलीस दलात धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 15:22 IST

पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) टू डीजीपी (पोलीस महासंचालक) अशा सर्वांच्याच मुखात असलेला हा विषय म्हणजे बदलीचा (स्थानांतरण) विषय होय. बदलीच्या या विषयामुळे संबंधितांकडून कोरोनाचीही चर्चा तात्पुरती बाजूला सारली जात आहे.

ठळक मुद्देटॉप-टू-बॉटम बदलीचाच विषय

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य पोलिस दलाला सध्या एकाच विषयाने ढवळून काढले आहे. धावपळ वाढवली आहे. पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) टू डीजीपी (पोलीस महासंचालक) अशा सर्वांच्याच मुखात असलेला हा विषय म्हणजे बदलीचा (स्थानांतरण) विषय होय. बदलीच्या या विषयामुळे संबंधितांकडून कोरोनाचीही चर्चा तात्पुरती बाजूला सारली जात आहे.

दरवर्षी जून-जुलैपर्यंत राज्य पोलीस दलातील सार्वत्रिक बदल्या व्हायच्या. बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांच्या पाल्यांच्या शाळा-महाविद्यालय प्रवेशाचा मुद्दा लक्षात घेऊन जून-जुलैचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जून-जुलैला फाटा देऊन बदलीचा विषय लांबणीवर टाकण्यात आला. त्यांच्यानंतर सरकार बदलले आणि पोलिसांच्या बदलीचा विषय आणखीनच क्लिष्ट ठरला. त्यात कोरोनानेही नाक खुपसले. बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांच्या नावावर आणि ठिकाणावर एकमत होत नसल्याने वारंवार बदलीच्या मुद्याला बगल दिली जाऊ लागली. अखेर सप्टेंबर महिन्यात हा विषय मार्गी लागला. २ आणि ३ तसेच १७ सप्टेंबरला बदलीसाठी पात्र असणाऱ्यांपैकी बहुतांश अधिकाऱ्यांची बदली झाली. अनेकांना पदोन्नतीही मिळाली.अनेक ‘गॅस’वरगुरुवारी जाहीर झालेल्या यादीनुसार, पोलीस अधीक्षक, उपायुक्तांपासून तो अतिरिक्त महासंचालकांपर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांना वेटिंगवर (पोलिसांच्या भाषेत गॅसवर) ठेवण्यात आल्यामुळे ते ‘हमसे क्या भूल हुई’, असा प्रश्न करीत आहेत. दुसरे म्हणजे, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या ‘निवड-नियुक्ती’चा मुद्दाही शिल्लक आहे. त्यासाठी त्यांनी आता धावपळ सुरू केली आहे. नागपुरात नऊ हजारांपैकी सुमारे एक हजार अधिकारी-कर्मचारी बदलीस पात्र आहेत. त्यातील काहींनी आपापल्या परीने लॉबिंगही चालविले आहे. काहींनी पॅकिंगही सुरू केले आहे.मुख्यालयातून २४ तासांचा अल्टिमेटमशहर पोलीस मुख्यालयातून १७ सप्टेंबरला स्थानिक वरिष्ठांना पत्र पाठविण्यात आले. बदलीसाठी पात्र असलेल्या तुमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचा सेवापट पोलीस मुख्यालयात विशेष दूतामार्फत सादर करा, असे या पत्रात नमूद आहे. सेवापटाच्या यादीत संबंधित कर्मचाऱ्याला मिळालेले रिवॉर्ड, शिक्षा आणि अन्य बाबींचाही उल्लेख करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. १८ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सेवापटाची यादी पोलीस मुख्यालयात सादर न झाल्यास संबंधित लिपिकाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही या पत्रातून देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस