शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

त्या मुलीचे सत्य शोधण्यासाठी पोलिसांची चमू राजस्थानला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:59 IST

गंगा जमुना येथील वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यात आलेल्या मुलीचे व त्या मुलीचा पिता म्हणवणाऱ्या व्यक्तीचे सत्य शोधण्यासाठी पोलिसांची चमू राजस्थानला जाणार आहे. चमूमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल यांचा समावेश राहणार आहे. पोलीस उपायुक्त (झोन-१) कृष्णकांत उपाध्याय यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देहायकोर्ट : पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंगा जमुना येथील वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यात आलेल्या मुलीचे व त्या मुलीचा पिता म्हणवणाऱ्या व्यक्तीचे सत्य शोधण्यासाठी पोलिसांची चमू राजस्थानला जाणार आहे. चमूमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल यांचा समावेश राहणार आहे. पोलीस उपायुक्त (झोन-१) कृष्णकांत उपाध्याय यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. ते न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित होते.न्यायालयाच्या आदेशानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने राजस्थानला जाऊन पीडित मुलगी व कथित पित्याचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी गोळा करून आणली होती. परंतु, त्यावर पुढे काहीच तपास करण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने गेल्या तारखेला पोलीस प्रशासनाची खरडपट्टी काढून त्यांच्यावर अपरिपक्व व पोस्टमन असे झणझणीत ताशेरे ओढले होते. तसेच, आयपीएस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य माहिती सादर करावी, असा आदेश दिला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी न्यायालयात उपस्थित होऊन राजस्थानला विशेष चमू पाठवित असल्याचे सांगितले. दरम्यान, अ‍ॅड. शशिभूषण वाहने यांनी फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेच्या एका प्रतिनिधीला व कथित पित्याला चमूस सहकार्य करण्यासाठी राजस्थानला पाठविण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून त्यासंदर्भात निर्देश दिलेत. पीडित मुलगी बुंदी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यामुळे तेथील पोलीस अधीक्षकांचे तपासाकरिता सहकार्य घ्यावे व आवश्यक मदतीसाठी या आदेशाची प्रत राजस्थान उच्च न्यायालयाला सादर करण्यात यावी असेही न्यायालयाने सांगितले. तपासकार्य पूर्ण करण्यासाठी पोलिसांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तेव्हापर्यंत पीडित मुलीला करुणा शासकीय आश्रयालयात ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करणे व अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारे रॅकेट नष्ट करणे यासाठी फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. संबंधित मुलीला या संस्थेनेच वेश्या व्यवसायातून बाहेर काढले आहे. संस्थेतर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी बाजू मांडली.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाHigh Courtउच्च न्यायालय