शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मसाज पार्लरआड सुरू असलेला पुन्हा एक कुंटनखाना उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:36 IST

उपराजधानीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचे अड्डे हळूहळू उघडकीस येत असतानाच बेलतरोडीतीलही एका कुंटनखान्याचा छडा लागला. बेलतरोडी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला हा कुंटनखाना शोधून काढत तेथून एक वारांगणेला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देबेलतरोडी पोलिसांचा छापा : महिलेसह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचे अड्डे हळूहळू उघडकीस येत असतानाच बेलतरोडीतीलही एका कुंटनखान्याचा छडा लागला. बेलतरोडी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला हा कुंटनखाना शोधून काढत तेथून एक वारांगणेला ताब्यात घेतले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी महिला आरोपी बरखा विजय मेश्राम (वय ३३, रा. चंद्रमणीनगर) आणि तिचा साथीदार आशिष सर्जेराव सयाम (वय २७, रा. गिट्टीखदान) या दोघांना अटक केली.झपाट्याने वाढणा-या आणि विकसित होणा-या उपराजधानीत हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चांगलाच फोफावला असून, देशीच नव्हे तर विदेशातील वारांगणांना नागपुरात बोलवून दलाल एका रात्रीत आंबट शौकीन ग्राहकांकडून हजारो रुपये उकळत आहेत. या आठवड्यात प्रणिता जयस्वाल आणि सचिन सोनारकर हे दोन मोठे दलाल पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून तीन रशियन (उझबेकिस्तान) वारांगणा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट चालविणा-या प्रणिता आणि सचिनच्या अटकेनंतर ठिकठिकाणच्या दलालांनी शहरातून पळ काढला असला तरी अनेक दलाल आणि वारांगणा अजूनही बिनबोभाट वेश्याव्यवसाय करत आहेत. बेलतरोडीतील एका बहुमजली ईमारतीत आरोपी बरखा मेश्राम आशिष सयामच्या मदतीने मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटनखाना चालवित असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त राजेंद्र धामनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय तलवारे, उपनिरीक्षक संदीप आगरकर आणि त्यांच्या सहका-यांनी कारवाईचा सापळा रचला. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी बरखाकडे एक ग्राहक पाठविले. दोन हजारांची मागणी करून त्याला बरखाने वारांगणा उपलब्ध करून दिली. काही वेळेनंतर पोलिसांनी तेथे छापा घातला आणि ग्राहकासोबत वारांगणेला ताब्यात घेतले. पैश्याचे आमिष दाखवून बरखा आणि आशिष वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती वारांगणने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी बरखा व आशिषविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.तीन सदनिका, सर्वच व्यवस्था!बरखा आणि आशिषने या भागात वेगवेगळ्या तीन सदनिका महिन्याला १५ हजार रुपये भाड्याने घेतल्या. प्रत्येक सदनिकेत बेडसोबत खाण्यापिण्याचीही व्यवस्था ते उपलब्ध करून देत होते. चार महिन्यापासून त्यांचा हा कुंटणखाना सुरू होता. त्यांच्याकडे ठरलेले ग्राहक यायचे. बरखाकडून पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कारवाईदरम्यान दोन हजार रुपये आक्षेपार्ह वस्तू आणि एक डायरी जप्त केली. या डायरीत अनेक ग्राहकांची नावे असल्याचे पोलीस सांगतात.१३ दिवसात सातवी कारवाईउपराजधानीत हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय कसा फोफावला आहे, ते गेल्या काही दिवसांतील कारवायांमधून उघड झाले आहे. गेल्या १३ दिवसांत कुंटणखान्यावर झालेली ही सातवी कारवाई आहे. त्यातील सर्वात मोठी कारवाई १४ सप्टेंबरला रामदासपेठेतील लोहारकर बंधूच्या सलूनमध्ये, २० सप्टेंबरला धंतोलीतील हॉटेल केपीईनमध्ये आणि २४ सप्टेंबरला सीताबर्डीतील हॉटेल गंगाकाशीमध्ये झाली होती. लोहारकर बंधूंकडे पाच वारांगना आढळल्या होत्या. केपीईनमध्ये प्रणिता जयस्वालकडे दोन उझबेकिस्तानच्या तर २४ सप्टेंबरला हॉटेल गंगाकाशीमध्ये सचिन सोनारकरसोबत उझबेकीस्तानची एक वारांगना पकडण्यात आली होती.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाraidधाड