शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:15 IST

भंडारा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १३) रात्री ९.१५ वाजता धाड टाकली.

ठळक मुद्दे१७ जणांना अटक नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १३) रात्री ९.१५ वाजता धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली. तेथून १७ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल २६ लाख ७९ हजार ४४ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपींकडून तब्बल १ लाख ४ हजार १३३ रुपये जप्त केले. त्यातही भंडारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून नागपूरच्या पथकाने भंडारा येथे जाऊन ही कारवाई केली असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.अटक केलेल्या आरोपींमध्ये १५ आरोपी हे नागपुरातील आहे. उर्वरित दोनपैकी एक भंडारा येथील तर दुसरा हा गोंदिया येथील रहिवासी आहे. शेख अमजद शेख रमजान (३२, रा. शांतिनगर, इतवारी), राजू सत्यनारायण अग्रवाल (४३, रा. एनआयटी कॉम्प्लेक्स, पारडी चौक), प्रवीण करणलाल गुप्ता (४०, रा. भवानीनगर, पारडी), अमन किशोर कपूर (३१, रा. कुंभारपुरा, इतवारी), विवेक आनंद जयस्वाल (२६, रा. छोटी मशीदजवळ, सदर), कुलदीपसिंग जागीरासिंग गिट्टल (३५, बाबादीप नगर), गोपाल भय्याजी कडू (२६, रा. कामगार नगर, नारी रोड), प्रमोद भाऊराव डोंगरे (४५, रा. महालक्ष्मीनगर, मानेवाडा रोड), राहुल सुरेंद्र जैन (३६, रा. बापूराव गल्ली, इतवारी), गज्जू मदनलाल अग्रवाल (३७, नेताजीनगर, कळमना रोड), अर्जुन अमरदीपसिंग राजपूत (२८, रा. मोहम्मद रफी चौक, एकता चौक, यशोधरानगर), मनोज गुरुमुख आलवानी (३२, जरीपटका), आशिष राजेश चौरसिया (२७, रा. कांजी हाऊस चौक, मंगळवारी रोड), लालचंद आत्माराम इंदनानी (४६, रा. संतकृपा निवास, जरीपटका), लक्ष्मण गोपालदास हरचंदानी (४६, रा. रितेश पॅलेस, जरीपटका) अशी नागपुरातील आरोपींची नावे असून फिरोज बदु्रद्दीन मैदानी (५०, रा. लक्ष्मीबाई वॉर्ड, स्टेडियम रोड, मशीदजवळ, गोंदिया) आणि घरमालक प्रेमदास मोहन रंगारी (६२, रा. म्हाडा कॉलनी, भंडारा) अशी इतर दोघांची नावे आहेत.भंडारा पोलीस अनभिज्ञनागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा येथे धाड टाकून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या १७ जणांना अटक केली. अलीकडच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यातही आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा २६ लाखांएवढा आहे. विशेष म्हणजे, भंडारा येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेटवर सट्टा लावला जात असताना भंडारा पोलिसांना याची कुणकुण लागली नाही का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.

टॅग्स :Cricketक्रिकेटCrimeगुन्हा