शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमित साहूच्या पॉलिग्राफ टेस्टसाठी पोलीस घेणार न्यायालयात धाव

By योगेश पांडे | Updated: January 3, 2024 13:35 IST

सना खान हत्याप्रकरण : साहूच्या आईच्या घरात आढळला मोबाईल, लॅपटॉप

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी अमित साहू याच्याकडून पोलिसांना हवे तसे सहकार्य होत नसल्याचे चित्र आहे. त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्यासाठी लाय डिटेक्टर टेस्ट किंवा पॉलिग्राफ चाचणीची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेता नागपूर पोलिसांनी याबाबत कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाकडे या चाचण्यांबाबत परवानगी मागण्यात येणार आहे. दरम्यान, अमित साहू याच्या आईच्या घरातून पोलिसांना एक मोबाईल व लॅपटॉप सापडला आहे. संबंधित मोबाईल सना खान यांचा आहे का याची सायबर तज्ज्ञांकंडून चाचपणी करण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्यात अमित साहूने पैशांच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या केली होती व त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शव हिरन नदीत फेकले होते. पोलिसांनी बरेच दिवस शोधमोहीम राबवली, मात्र सना खान यांच्या मृतदेह सापडला नाही. आरोपींनी सना खान यांचा मोबाईलदेखील नदीत फेकल्याचा दावा केला होता. पोलिसांना मोबाईलदेखील आढळला नव्हता. दरम्यान, अमित साहूच्या आईच्या घरी तपासणी केली असता तेथे एक मोबाईल व लॅपटॉप आढळला आहे. हा मोबाईल व लॅपटॉप अमितने तेथे नेऊन ठेवला होता. आता तो मोबाईल सना खान यांचा तर नाही, तसेच लॅपटॉपमध्ये नेमके काय आहे याचा शोध सायबर तज्ज्ञांच्या मदतीने घेण्यात येत आहे. संबंधित मोबाईलवर कुणाचा फोन आला होता, त्यातून कुणाला फोन करण्यात आला होता किंवा कोणते सीमकार्ड त्या मोबाईलवर वापरण्यात आले होते, इत्यादींचा शोधदेखील आयएमईआय क्रमांकाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. जर मोबाईलमध्ये काही डेटा आढळला तर तो या प्रकरणातील मोठा पुरावा ठरू शकेल.

- पोलिसांकडून अमितची चौकशी सुरू

अमितविरोधात नागपूर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर त्याला ताब्यात घेतले व ३० डिसेंबरपासून त्याची चौकशी सुरू होती. त्याच्या मूळ घराचा पत्ता त्याच्या चौकशीतून मिळाला. तेथे त्याची आई राहते. तेथेच मोबाईल व लॅपटॉप आढळले.

- न्यायालयाच्या परवानगीकडे पोलिसांचे लक्ष

पॉलिग्राफ टेस्ट व लाय डिटेक्टर टेस्टसाठी पोलिसांकडून न्यायालयात परत अर्ज करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीच्या आधारावरच पोलिसांकडून पुढील पावले उचलण्यात येतील, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालय