फिर्यादीला मागितली होती पाच लाखाची लाच नागपूर : फिर्यादीकडून लाच मागणाऱ्या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर विभागाने अटक केली. उमेश सोपान मचिंदर (४५) असे या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तो गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर पोलिसांची मान शरमेने खाली गेली आहे.तक्रारदाराने काही दिवसापूर्वी बँकेतून कर्ज काढले होते. मात्र यात काही हेरफेर झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणात तक्रारदारासह सहा जणांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादीने प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो अर्ज रद्द केला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी जामिनासाठी अपील दाखल केले होते. ६ मे रोजी फिर्यादीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. परंतु त्यासाठी आठवड्यात मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस तपास अधिकाऱ्यास तपासात सहकार्य करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेशही बजावले होते. त्यानुसार फिर्यादीला गुन्हे शाखा कार्यालयात हजेरी देण्याास जात होते. दरम्यान पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर याने फिर्यादीला मिळालेला जामीन न्यायालयातूनच रद्द करण्याची धमकी दिली. तसेच त्यासाठी पाच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली.
पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: June 16, 2016 03:11 IST