शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीवरील पोलीस बनले देवदूत : वाचविले बुडणाऱ्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:14 IST

पहाटेच्या वेळी तलावात उडी घेतलेल्या एका तरुणाला तातडीने मदत करून गुन्हे शाखेच्या पथक दोनच्या पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले. फुटाळा तलावावर मंगळवारी पहाटे ४.१५ च्या दरम्यानची ही घटना आहे.

ठळक मुद्देआर्थिक कोंडीमुळे तरुणाने घेतली होती तलावात उडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहाटेच्या वेळी तलावात उडी घेतलेल्या एका तरुणाला तातडीने मदत करून गुन्हे शाखेच्या पथक दोनच्या पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले. फुटाळा तलावावर मंगळवारी पहाटे ४.१५ च्या दरम्यानची ही घटना आहे.गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक दोनमधील पोलीस अधिकारी-कर्मचारी मंगळवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत होते. फुटाळा तलावावरील एकाने आरडाओरड करून पोलिसांचे लक्ष वेधले. तलावात एका तरुणाने उडी घेतल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, हवालदार प्रकाश वानखेडे, विजय लेकुरवाळे आणि नायक बलजितसिंग यांनी लगेच वाहनातून उतरून टॉर्चने तलावात बघितले असता एक तरुण पाण्यावर जीव वाचविण्यासाठी हातपाय मारत असल्याचे त्यांना दिसले. पहाटेची वेळ असल्याने आणि तरुण तलावाच्या काठावरील भिंतीनजीकच असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे आरोपींना बांधण्यासाठी वापरण्यात येणारा दोर फेकला. दोर जास्त लांब नसल्याने तरुणापर्यंत जात नव्हता. त्यामुळे बंदोबस्ताच्या वेळी वापरण्यात येणाºया कठड्याची बल्ली काढून त्याला दोर बांधून तरुणाकडे फेकला आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला धीर दिल्यानंतर त्याची विचारपूस करण्यात आली. त्याने आपले नाव सौरव प्रकाश गुलालगिरी (वय १९) असे सांगितले. तो आपल्या मामाकडे महावीरनगरात राहतो. महत्त्वाच्या कामासाठी दिलेली रक्कम भलत्याच ठिकाणी कामी लावल्यामुळे त्याची कोंडी झाली. त्यामुळे सौरवने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यात उडी घेतल्यानंतर त्याला जीवाचे मोल कळले. त्यामुळे त्याने आरडाओरड केली. सुदैवाने एक व्यक्ती तेथून जात असल्याने त्याच्या ते लक्षात आले. त्यामुळे त्याने उपरोक्त पोलिसांचे वाहन थांबवून त्यांना तलावात एकाने उडी घेतल्याची माहिती दिली आणि पोलिसांनी तत्परता दाखवून सौरवचे प्राण वाचविले. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देऊन अंबाझरी पोलीस ठाण्याला कळविण्यात आले.पोलीस आयुक्तांकडून प्रशंसाकम्युनिटी पुलिसिंगची संकल्पना राबविणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना ही माहिती कळताच त्यांनी सौरवचा जीव वाचविणाऱ्या पोलिसांची प्रशंसा केली. विशेष म्हणजे, सौरव गुलालगिरीला तलावाबाहेर काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागपूरकरांनीही उपरोक्त पोलिसांचे कौतुक केले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस