शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डीजेसाठी पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:11 IST

डीजे बंद करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. सोमवारी रात्री जरीपटका परिसरात ही घटना घडली. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देजरीपटक्यातील घटना : १० च्या विरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डीजे बंद करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. सोमवारी रात्री जरीपटका परिसरात ही घटना घडली. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्षाला रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान जरीपटका परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या इमारतीच्या छतावर डीजे वाजत असल्याची सूचना मिळाली. माहितीनुसार जरीपटकाचे कॉन्स्टेबल मनोज गाडगे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मनोज यांना इमारतीच्या छतावर डीजे वाजताना आढळला. त्यांनी छतावर जाऊन डीजे बंद करण्यास सांगितले. येथे अंडरसहारे कुटुंबातील सदस्य जन्मदिनाची पार्टी करीत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्टीमध्ये असलेले लोक दारूच्या नशेत होते. हे लोक कॉन्स्टेबल गाडगे यांच्याशी भांडण करू लागले. त्यांनी संयम बाळगण्यास सांगताच आरोपींना राग आला व संजय अंडरसहारे व सुनील अंडरसहारे व त्यांच्या भाच्यासहित आठ-दहा लोकांनी गाडगे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी शिवीगाळ करीत गाडगे यांना मारहाणही केली व वर्दी उतरविण्याची धमकी दिली. गाडगे यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र आरोपींद्वारे अधिकाऱ्यांनाही धमकावण्यात आले. जरीपटका पोलिसांनी आरोपींच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे व धमकाविणे व दंगा करण्याचा गुन्हा दाखल केला. प्रकरण दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी कुटुंबासह फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे