शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घटस्फोटित महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:59 IST

घटस्फोटित महिलेशी शरीरसंबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घटस्फोटित महिलेशी शरीरसंबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनीअटक केली. विक्रमसिंग बनाफर आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. पीडित महिला अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुदामनगरात राहते. १४ वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिला एक मुलगाही आहे. घरगुती कारणावरून पती पत्नीत वाद झाल्यानंतर पतीने तिच्यापासून घटस्फोट घेतला. तिचा मुलगा तिच्या पतीजवळच राहतो. ती एका बिल्डरकडे काम करते आणि एकटीच राहते.आरोपी बनाफरसोबत सहा वर्षांपूर्वी तिची ओळख झाली. त्यावेळी तो पोलीस दलात नव्हता. बेसा बेलतरोडीतील एका मित्राकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे आले असताना त्यांनी येथे मुक्काम केला. महिलेच्या तक्रारीनुसार यावेळी बनाफरने तिला गुंगीचा पदार्थ दिला आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मोबाईलमध्ये त्याने या संबंधाची अश्लील क्लिप बनविली. ती क्लिप दाखवून तो तिच्यासोबत नंतर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करू लागला. तब्बल सहा वर्षांपासून त्यांच्यात शंभरपेक्षा जास्त वेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. तीन वर्षांपूर्वी तो पोलीस मुख्यालयात रुजू झाला. त्यांच्यात अनेकदा लग्न करण्याचाही विचार झाला. मात्र कधी तो तर कधी ती तयार नसल्याने त्यांचे लग्न झाले नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी बनाफरचे लग्न झाले. आता त्यापासून आपली सुटका होईल, असे पीडित महिलेला वाटत होते. मात्र तो लग्नानंतर तिच्याकडे वारंवार यायचा आणि जनावरासारखा वागायचा. तिच्यासोबत तो अनैसर्गिक कृत्यही करायचा. २२ सप्टेंबरला त्याने सगळ्या सीमा ओलांडल्या. त्याच्या किळसवाण्या कृत्याला तिने विरोध केला असता त्याने मारहाणही केली आणि धमकीही दिली. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे पीडित महिलेने बुधवारी सायंकाळी बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार विजया आकोत यांनी तिची फिर्याद ऐकून घेतल्यानंतर आरोपी विक्रमसिंग बनाफर याच्याविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली.मैत्रिणीकडे घेतला आधारपीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी बनाफर तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करताना विकृत कृत्य करायचा.त्याच्या दहशतीमुळे पीडित महिला तिच्या मैत्रिणीकडे जाऊन लपली होती. मैत्रिणीने आधार दिल्यामुळेच तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक