शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 21:43 IST

पुणे, मध्यप्रदेशातून पोहोचले ग्राहक, गुन्हे शाखेची अवैध डान्सबारवर कारवाई

योगेश पांडेनागपूर : नागपुरात एका बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्य व तरुणींवर पैसे उधळण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. संबंधित अवैध डान्सबारमध्ये पोहोचलेल्या २० हून अधिक ग्राहकांसह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथे तीन तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये अश्लिल नृत्य करत होत्या. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

जुनी कामठी मार्गावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या शिवशक्ती बारमध्ये हा ‘छमछम’चा प्रकार सुरू होता. पोलिसांनी खबऱ्यांकडून याची माहिती मिळाली. तेथे अश्लिल नृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री एक वाजताच्या सुमारास तेथे धाड टाकली. तेथे तीन तरुणी तोकड्या कपड्यांत नृत्य करत होत्या व त्यांच्यावर तेथील ग्राहक पैसे उधळत होते. पोलिसांची धाड पडताच तेथे अफरातफर माजली व अनेकांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरदेखील पोलिसांचे पथक उपस्थित होते.

पोलिसांनी बारचे मालक गोपाल उर्फ पप्पु चंपालाल यादव (५४) व त्याचा मुलगा दिप यादव (३०, इतवारी रेल्वे स्थानकाजवळ, शांतीनगर), बारचा व्यवस्थापक गुलाब ताराचंद राहांगडाले (३८, एकात्मता नगर, हिंगणा मार्ग) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे कुठलाही परवाना नसताना हा प्रकार सुरू होता.बारमध्ये असलेले संजय सिताराम बारापात्रे (५९, नंदनवन), प्रदीप शंकरराव गोंडाणे (५४, बेलतरोडी), प्रदीप प्रल्हाद गजभिये (५७, सुगतनगर), रमेश शांताराम मल्लेवार (४३, समतानगर), सचिन अजाबराव भुसारी (४०, तोंडाखैरी, धापेवाडा), जितेंद्र लोकचंद राहांगडाले (३३, खैरी, मध्यप्रदेश), सुबोध बापुराव पगाडे (४०, किल्ला रोड, महाल), अतुल महेकराव कटरे (२४, एकात्मतानगर, हिंगणा), मयुर दिपक डहाळे (३५, विद्या नगर), सौरभ शिवराज दहीवाळ (४६, वसमत रोड, परभणी), पवन लक्ष्मीकांत देशपांडे (३५, पुणे), अनिल गोविंद कांबळे (५०, पुणे), सूरज महादेवराव दवाळे (३५, रागोरगाव मेघे, वर्धा), अभय शांताराम घाटोळे (५२, जुनी मंगळवारी), शेरू कमलाकर चिंचधरे (३०, जुनी मंगळवारी), विजेंद्र रामनाथ शाहु (३५, संत तुकाराम नगर), राहुलप्रभाकर सपकाळ (३५, मेहंदीबाग), हितेश मस्तराम ठाकुर (३२, कळमना), प्रफुल्ल सुरदास चव्हाण (५०, रामकृष्णनगर), विकास गणेशराव काळे (३६, गणेश नगर, वर्धा), रामनाथ नागनाथ दिल्लीकर (४०, यादगीर, कर्नाटक), मुकेश मुलचंद यादव (५४, परासिया, छिंदवाडा) यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तेथून रोख ४६ हजार, तीन दुचाकी, दोन कार, २४ मोबाईल असा २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींना कळमना पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, गजेंद्रसिंग ठाकूर, शाम अंगुथलेवार, सचिन श्रीरामे, दीपक बिंदाणे, विलास चिंचुलकर, अश्विनी खोडपेवार, जितेशाचारी आरवेल्ली, युवानंद कडू, अभिषेक शनवारे, महेश काटवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस