शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

बलात्काऱ्यांना का पकडत नाहीत पोलीस

By admin | Updated: December 9, 2015 03:15 IST

घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला.

नागपूर : घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. शिक्षण घेऊन या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आणि एका चांगल्या आयुष्याची स्वप्न रंगविणाऱ्या एका तरुणीच्या स्वप्नांचा गावातीलच काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी चुराडा केला आणि त्या तरुणीचे भावविश्वच कोसळले. गरिबीचे चटके सोसणाऱ्या एका असहाय तरुणीला काही तरुणांनी सहा दिवस एका खोलीत डांबून ठेवून सातत्याने अत्याचार केला. या तरुणांना धडा शिकविण्यासाठी पीडित तरुणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता, तिलाच दमदाटी करून पिटाळून लावले. एवढेच नव्हे तर तक्रार दिल्यास पीडित तरुणी आणि तिच्या आईविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यासही पोलीस विसरले नाहीत. हिवाळी अधिवेशनात तरी मायबाप सरकार आपली दखल घेईल, या भावनेने ती नागपुरात पोहचली. परंतु येथेही दिवसभर भटकंती करून तिच्या पदरात निराशाच पडली. स्त्रियांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी तमाम कडक कायदे असतानाही एका युवतीला न्यायासाठी दारोदार भटकावे लागते, यापेक्षा काय शोकांतिका असावी?चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस तालुक्यातील एका गावातील वनमजूर महिलेच्या मुलीसोबत घडलेली ही क्रूर घटना आहे. घरची परिस्थिती हलाखीची असूनही शिक्षणाची आवड असल्यामुळे कशीबशी बारावीला शिकत असलेल्या तरुणीसोबत ही अमानुष घटना घडली आहे. ४ नोव्हेंबरला तिच्याच गावातील गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी घरी एकटी असल्याचे पाहून चाकूच्या धाकावर तिला पळवून नेले. पोलिसांनीच दिली धमकी नागपूर : एका मित्राच्या खोलीवर सहा दिवस डांबून ठेवले. सहा दिवसात त्यांनी सातत्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यांच्या तावडीतून शिताफीने सुटका केल्यावर तरुणी घरी पोहचली. आईला तिने आपबिती सांगितली. लगेच तिच्या आईने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. परंतु पोलिसांची भूमिका बघून त्यांना धक्काच बसला. गुन्हा दाखल करायचा सोडून, या मायलेकींनाच खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी पोलिसांनी देऊन पिटाळून लावले. चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांचीही तिने भेट घेतली. परंतु त्यांनीही तिचे समाधान केले नाही. अद्याप न्याय मिळालाच नाहीकुणीतरी दखल घ्यावी, या भावनेतून ही युवती आपल्या आईसोबत मंगळवारी नागपुरात दाखल झाली. सरकार नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्यापर्यंत पोहचून आपल्या वेदना सांगण्यासाठी तिने दिवसभर प्रयत्न केला. लाल गाडीच्या दिव्याजवळ जाण्याचा तिने प्रयत्नही केला. पण सामान्य युवतीचे ऐकून घेण्यासाठी कुणीच वेळ दिला नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून ती धरणे परिसरातही गेली. खाकी वर्दीतले पोलीस न्याय देतील, अशी अपेक्षा होती. पण नाहीच. शेवटी पत्रकार भवनात ती पोहचली. आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे तिने ठरविले. पत्रकार परिषदेला पैसे लागत असल्याचे तिला समजल्याने ती हतबल झाली. पत्रकार संघाने आणि काही पत्रकारांनी पुढाकार घेऊन तिच्याकडून एकही रुपया न घेता, तिची बाजू पत्रकार परिषदेत ऐकून घेतली. उपाशी असलेली ही मुलगी आणि तिच्या आईची पत्रकारांनी भोजनाची व्यवस्था करून परतीसाठी आर्थिक मदतही केली. तिला न्याय मात्र अद्यापही मिळालेला नाही.