शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वीणा बजाज यांना पोलीस कोठडी रिमांड

By admin | Updated: October 8, 2015 02:30 IST

भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज यांना .....

न्यायालय : अपसंपदा प्रकरण नागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. मंगळवारी वीणा बजाज यांना अटक करण्यात आली होती. जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज यांच्या निवासस्थानी, सोसायटी कार्यालय आणि परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ सप्टेंबर रोजी धाड घालून १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख जप्त केले होते. या शिवाय पथकाला २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किंमतीचे घरगुती सामान आढळले होते. पथकाला एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली होती. सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती. बजाज यांच्याविरुद्ध २६ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई)(ड), १३ (२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशी करीत असता पथकाला वीणा बजाज यांच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी आणि पुरावे आढळून येताच त्यांना अटक करण्यात आली. दीपक बजाज यांना सचिव या नात्याने शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्याचे अधिकार असताना त्यांनी प्रतीक घोडे नावाच्या चित्रकला शिक्षकाची नेमणूक करण्याचे अधिकार आपली पत्नी वीणा बजाज यांना दिले होते. वीणा बजाज यांनी एकटीने ५ नोव्हेंबर २०१४ रोजी घोडे यांची मुलाखत घेतली होती. वीणा यांनी प्रतीक घोडेला १० लाखांची मागणी केली होती. त्यापैकी तीन लाख रुपये आधी घेतले होते. कोऱ्या स्टॅम्पपेपरवर घोडे याची सहीही घेतली होती. घोडे हा वारंवार मागणी करूनही सात लाख रुपये देत नसल्याने त्याला राजीनामा देण्यासाठी वारंवार धमक्या देऊन मानसिक त्रास देण्यात आला होता. पुढे तो पैसे देऊ न शकल्याने त्याला १० महिन्यांतच कामावरून काढून टाकण्यात आले होते. धाडीच्या कारवाईत पथकाला कोऱ्या स्टॅम्पपेपरवर तीन शिक्षकांच्या सह्या आढळल्या होत्या. मिती बच्चर, हरजित होडा यांनाही त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे न दिल्याने कामावरून काढून टाकले होते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शुल्कातही मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)