शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: September 15, 2015 06:00 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असल्यामुळे राजभवनासह उपराजधानीतील विविध भागात

नागपूर : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असल्यामुळे राजभवनासह उपराजधानीतील विविध भागात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या विशेष सुरक्षा पथकातील अधिकाऱ्यांच्या दिशानिर्देशांवरून उपराजधानीत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राष्ट्रपती नागपूरच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे चार दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या उपाययोजना ठरविण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या हॉटेलसह लॉजची तपासणी सुरू आहे. विमानतळापासून राजभवनापर्यंतचा परिसर आणि कार्यक्रमस्थळावर दोन दिवसांपासून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. हवाईमार्गे बाहेरून येणाऱ्यांची माहिती ठेवली जात असून, शहराला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर नाकाबंदी, वाहनांची, व्यक्तींची तपासणी केली जात आहे. रस्त्यावरचा बंदोबस्त आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबईतून आलेल्या विशेष सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत विशेष सुरक्षा दलाचे (एसपीयू) स्थानिक अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही जातीने बंदोबस्त हाताळत आहेत.(प्रतिनिधी)वाढली होती काळजीराष्ट्रपतींच्या आगमनाच्या तासाभरापूर्वी वातावरण एकाएकी बदलले. दुपारीच एकाएकी अंधार पडला. मुसळधार पाऊसही झाला. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांची काळजी वाढली होती. मात्र, राष्ट्रपतींच्या आगमनाच्या काही वेळेपूर्वी पुन्हा वातावरण जैसे थे झाले. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांवरील ताण कमी झाला.