शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुन्हेगारांसोबत पोलीस शिपायाचा डान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:59 IST

कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात शहर पोलिसातील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे.

ठळक मुद्देकोतवाली पोलीस ठाण्यातील प्रकार : व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांची फजिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात शहर पोलिसातील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे.या व्हिडिओमध्ये कोतवाली पोलीस ठाण्यातील शिपाई ताजबागचा गँगस्टर आबू आणि शांतिनगरमधील गुन्हेगार अशोक बावाजी याच्यासोबत दिसून येत आहे. दोन्ही गुन्हेगार शिपायासोबत नाचगाणे करीत मौजमजा करीत आहेत. शिपाई आणि दोन्ही गुन्हेगार आपल्या साथीदारांसह अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध ‘याराना’ या चित्रपटातील गाणे ‘तेरे जैसा यार कहाँ...’ या गाण्यावर स्टेजवर नाचताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसून येते की, ‘गुन्हेगारांनी एका पार्टीचे आयोजन केले असून, त्यात पोलीस शिपाईसुद्धा सहभागी झाला आहे. आबू एकावेळी सक्करदरा पोलीस ठाणे परिसरातील चर्चित नाव होते. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. तत्कालीन पोलीस उपायुक्त निषिथ मिश्र यांनी त्याला एमपीडीएअंतर्गत तुरुंगातही पाठविले होते. यानंतर आबूच्या कारवायांवर वचक बसला. परंतु आबू आणि त्याच्या कुटुंबाचा दबदबा ताजबाग परिसरात कायम आहे. त्याचप्रकारे अशोक बावाजी हासुद्धा शांतिनगर पोलीस ठाणे परिसरातील चर्चित नाव आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. इतवारी स्टेशनजवळ जुगार अड्डा चालवीत असल्याने तो नेहमीच चर्चेत राहतो. त्याच्या अड्ड्यावर अनेकदा पोलिसांनी धाड टाकून नेत्यांनाही पकडले आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये बावाजीची उपस्थिती पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.सूत्रानुसार गुन्हेगारांनी नुकतीच बर्थडे पार्टी आयोजित केली होती. यात कोतवाली पोलीस ठाण्यातील शिपायासह सात-आठ पोलीस कर्मचारीही सहभागी झाले. पार्टीतील काही लोक व्हिडिओ क्लिपिंग बनवत असल्याचे लक्षात येताच, इतर पोलीस कर्मचारी तेथून रवाना झाले. तडीपार असूनही बावाजी तिथे उपस्थित असल्याने पोलिसांची फजिती वाढणे निश्चित आहे. तडीपार असतानाही गुन्हेगार शहरात सक्रिय असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या घटनांमुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या निर्देशानुसार, ठाण्यात तडीपार गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे.दारू पिऊन शिपायाने घातला गोंधळत्याचप्रकारे पंचशील चौकात वर्धा येथील एका पोलीस शिपायाने दारू पिऊन गोंधळ घातला. वर्धा पोलिसचा शिपाई संदीप खंडारे मंगळवारी रासायनिक प्रयोगशाळेत नमुने जमा करण्यासाठी आला होता. नमुने जमा केल्यानंतर तो पंचशील चौकातील बारमध्ये दारू प्याला. बारमधून निघाल्यावर पंचशील चौकातच तो गोंधळ घालू लागला. याची माहिती मिळताच धंतोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम ११० आणि ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. धंतोली पोलीस या प्रकरणाचा रिपोर्ट वर्धा पोलिसांना पाठविणार आहे. या आधारावर त्याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाईसुद्धा केली जाईल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीस