शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलिसांचे ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन, ३०५ गुन्हेगारांची झाडाझडती

By योगेश पांडे | Updated: April 25, 2025 01:31 IST

पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही, तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकाने फोटो काढून त्याचा अहवालदेखील तयार केला आहे.

नागपूर : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावे यासाठी नागपूर पोलिसांनी ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या दरम्यान पोलिसांनी ३३ पोलिस ठाण्यांअंतर्गत असलेल्या ३०५ गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर्सची झाडाझडती घेतली. पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही, तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकाने फोटो काढून त्याचा अहवालदेखील तयार केला आहे.पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पाचही परिमंडळाच्या उपायुक्तांना कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची सूचना केली होती. त्याअंतर्गत नाकाबंदी, ऑपरेशन ऑल आउटदेखील राबविण्यात आले. यात एमपीडीए, मकोका, इत्यादी कारवाई झालेल्या गुन्हेगारांच्या घरी जाऊन पाहणी करण्यात आली. पोलिसांनी एकूण ३०५ आरोपींची झडती घेतली. त्यात हद्दपारीची कारवाई झालेले १०३, मकोकाची कारवाई झालेले १८, हिस्ट्रीशीटर १९, इतर गुन्हेगार २५, इत्यादींचा समावेश होता. सर्व आरोपींची सिंबा आयडी अपडेट आहे की नाही, याचीदेखील खातरजमा करण्यात आली.

काही आरोपी पत्त्यावरून फरारया ऑपरेशनदरम्यान पोलिसांना काही गुन्हेगार त्यांच्या पत्त्यावर आढळलेच नाही. ते गुन्हेगार घर सोडून बाहेरगावी गेल्याची किंवा फरार झाल्याची बाब समोर आली. काही गुन्हेगार हे हातमजुरी, पाणीपुरीचे ठेले चालवणे, बाहेरील जिल्ह्यात शिक्षण घेणे, पेंटिंगचे काम करणे, आजारी असल्याचे निदर्शनास आले. या अभियानादरम्यान वाडी पोलिस स्टेशनअंतर्गत ऋषभ वासुदेव गवई (वय २७) व श्याम सुभाष आत्राम (२३) यांना अटक करण्यात आली.

व्हिडीओ कॉलवरून संपर्कपोलिस उपायुक्त महेक स्वामी यांनीदेखील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद शकील आणि खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आलेला अभय नावाचा आरोपी यांची तपासणी केली व प्रतिबंधक कारवाई केली. बेलतरोडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हिस्ट्रीशीटर आरोपी रामस्वरूप हा पत्त्यावर आढळला नाही. त्याच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. तो अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे पेेंटिंगचे काम करत असल्याची बाब समोर आली.

टॅग्स :Policeपोलिस