शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात लाचखोर सहायक फौजदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 10:18 IST

अपघातप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.

ठळक मुद्दे‘एसीबी’ची सावनेरात कारवाई १० हजार रुपयांची मागितली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघातप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.हुसेन खॉ पठाण असे अटक करण्यात आलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. फिर्यादी राजेश नत्थूजी देशभ्रतार (४६, रा. खापरखेडा, ता. सावनेर) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. मार्च महिन्यात त्यांच्या मालकीच्या ट्रकने सावनेर शहरालगतच्या वाघोडा येथील विजेच्या खांबाला धडक दिली होती. या घटनेचा तपास हुसेन खॉ पठाण याच्याकडे होता. त्याने ट्रकमालक राजेश देशभ्रतार यांना फोन करून ट्रकचालकास अटक व ट्रक जप्तीची कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती.हा ‘कॉल’ देशभ्रतार यांनी ‘रेकॉर्ड’ करून ठेवला होता. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली होती. सोबतच ‘कॉल रेकॉर्डिंग’ सादर केली होती.या आधारे एसीबीच्या पथकाने २२ मार्च रोजी हुसेन खॉ पठाण याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, त्याला या कारवाईची माहिती मिळाल्याने यात ‘एसीबी’च्या पथकाला यश आले नव्हते. त्यामुळे ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी सकाळी सावनेर पोलीस ठाणे गाठून हुसेन खॉ पठाण याला ताब्यात घ्ोत अटक केली आणि नागपूरला घेऊन गेले.

टॅग्स :Crimeगुन्हा