शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पोलीस ठाण्यातून पळलेल्या आरोपीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 11:24 PM

Arrested the accused who fled the police station पाचपावली पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी हुडकून काढले. विशेष म्हणजे, तो पळून गेल्यामुळे ज्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते, त्याच पोलीस उपनिरीक्षकांनी दोन दिवस सलग परिश्रम घेऊन अखेर आज त्याच्या मुसक्या आवळन्यात यश मिळवले.

ठळक मुद्देनिलंबित पीएसआयची धावपळ फळाला : उप्पलवाडीच्या जंगलात आवळल्या मुसक्यादोन दिवस सलग परिश्रमअखेर क्लू मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी हुडकून काढले. विशेष म्हणजे, तो पळून गेल्यामुळे ज्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते, त्याच पोलीस उपनिरीक्षकांनी दोन दिवस सलग परिश्रम घेऊन अखेर आज त्याच्या मुसक्या आवळन्यात यश मिळवले.

उबेद रजा इकराम उल हक असे आरोपीचे नाव आहे. उबेद पाचपावलीतील अपोलो मेडिकल स्टोअर्सचा संचालक आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलीस उपनिरीक्षक मनिष गोडबोले यांनी सापळा रचून रविवारी २ मे रोजी उबेदला रंगेहात पकडले होते. तो पाचपावली पोलिसांच्या कस्टडीत होता. मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात गर्दी झाल्याचे पाहून उबेदने ठाण्यातून पळ काढला. या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी उपायुक्तांकडून चौकशी करून घेतली. आरोपी

पळून जाण्यास पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत गोडबोले यांना गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले. ज्या आरोपीला आपण सापळा रचून पकडले तोच आरोपी आपल्या दुर्लक्षितपणामुळे पळून गेल्याने नोकरीवर गदा आल्यामुळे गोडबोले गेल्या दोन दिवसापासून झोपलेच नाही. ते पोलिस ठाण्यात राहुनच आरोपी छडा लावण्यासाठी प्रयत्न करू लागले. अखेर शनिवारी दुपारी त्यांना क्लू मिळाला. त्याआधारे गोडबोले आपल्या सहकाऱ्यांसह यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उप्पलवाडीतील झुडपी भागात पोहोचले. तेथे दडून असलेल्या आरोपी उबेद रजा याच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे.

कारवाईबद्दल विचार

ज्या चुकीमुळे गोडबोले यांना निलंबित करण्यात आले त्या आरोपीला पकडून गोडबोले यांनी ती चूक दुरुस्त केली. त्यामुळे त्यांच्या निलंबनाच्या कारवाईबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :ArrestअटकPolice Stationपोलीस ठाणे