शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नराधमाच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:45 IST

निरागस बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. बंट्या ऊर्फ करण दीनदयाल डांगे (वय २०) असे या नराधमाचे नाव असून, तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या बंट्या त्याच्या बहीण-जावयाच्या घरी डिप्टी सिग्नलमध्ये राहतो. तो एका आरामशीनवर काम करतो. दरम्यान, अत्याचारग्रस्त बालिकांना मेयोत दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपीडित बालिका मेयोत दाखल : दारूच्या नशेत केले कुकृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निरागस बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. बंट्या ऊर्फ करण दीनदयाल डांगे (वय २०) असे या नराधमाचे नाव असून, तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या बंट्या त्याच्या बहीण-जावयाच्या घरी डिप्टी सिग्नलमध्ये राहतो. तो एका आरामशीनवर काम करतो. दरम्यान, अत्याचारग्रस्त बालिकांना मेयोत दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.बंट्या एका आरामशीनवर काम करतो. साप्ताहिक पगार घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान तो यथेच्छ दारू पिला. वस्तीतील एका लग्नसमारंभात बिनबुलाए मेहमान बनून तो भोजनस्थळी शिरला. तेथे त्याने जेवण केले आणि सायकलने पुढे निघाला. मंदिराजवळ दोन बालिका खेळत असल्याचे पाहून बंट्यातील नराधम जागा झाला. आई बोलवत आहे, असे सांगून त्याने चार वर्षांच्या चिमुकलीला कडेवर घेतले तसेच सहा वर्षांच्या चिमुकलीचे बोट पकडून तो रेल्वे लाईनजवळच्या झुडपात शिरला. एकांत पाहून बालिका घाबरल्या आणि रडू लागल्या. नराधम बंट्याने त्यांना चाकू दाखवून गप्प केले. तेथे या निरागस बालिकांवर अत्याचार करून पळून गेला. दरम्यान, रडणाऱ्या बालिका दिसल्यामुळे मजुरांनी त्यांना जवळ घेतले आणि त्यांच्या घरी पोहचवले. बालिकांची स्थिती पाहून त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला. त्यांना मेयोत दाखल करण्यात आले. परिसरात चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याचे वृत्त पसरताच संतापाची लाट उसळली. दरम्यान, लकडगंज ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली.या प्रकरणाचे वृत्त वायुवेगाने शहरात पसरले. सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त होत असतानाच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ते मुंबईत होते. मात्र, त्यांनी गुन्हे शाखेसह शहरातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीचा तातडीने छडा लावून त्याच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले. त्यानुसार, वेगवेगळी तपास पथके आरोपीचा शोध घेऊ लागली. आरोपीचा डोळा सुजला आहे, एवढीच एक टीप पोलिसांकडे होती. त्याआधारे पोलिसांनी २५ पेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली. दुसरीकडे बंट्या बुधवारी सकाळपासूनच दारूच्या नशेत परिसरात फिरू लागला. रात्रीच्या वेळी तो सायकलसह एका गल्लीत पडला अन् तसाच पडून राहिला. त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.त्यामुळे तो सुजला होता. मध्यरात्रीनंतर शोधाशोध करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस बंट्या पडला. त्याच्या डोळ्याला असलेली जखम आणि सूज पाहून पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा आरोपी बंट्या मोठमोठ्याने रडू लागला. आपण पाप केल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला लकडगंज ठाण्यात नेले. पहाटे २.३० वाजता त्याला अटक करण्यात आली.५० हजारांचा पुरस्कारपरिमंडळ-३ चे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदूरकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष खांडेकर, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, पीएसआय प्रफुल्ल गाडेकर, रवी राठोड, हवालदार भोजराज बांते, प्रकाश सिडाम, विजय हातकर, रमेश गोडे, तेजराम देवळे, अनिल अंबादे, अजय बैस, दीपक कारोकर, यशवंत डोंगरे, शिपाई हिरालाल राठोड, राम यादव, प्रशांत चचाणे, दीपक सोनटक्के, फिरोज पठाण, शिवराज पाटील, भूषण झाडे, वासुदेव जयपूरकर आदींनी ही कामगिरी बजावली. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी या तपास पथकाचे कौतुक करून त्यांना ५० हजारांचा पुरस्कार जाहीर केला आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटक