लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव’ असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये मांडले.बहिणाबाई चौधरी या मराठी साहित्य विश्वातील महान कवयित्री आहेत. निरक्षर बहिणाबाईंना काव्य प्रतिभेची उपजत देणगी होती. दैनंदिन घरकाम, शेती करताना त्या उत्स्फूर्तपणे ओव्या, म्हणी म्हणत गात असत. अशिक्षित असून सुध्दा त्या साध्या भाषेत अहिराणी गाणी व काव्याचे रचना करीत असत. त्यांच्या कवितांद्वारे अडचणीच्या प्रसंगी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कसे जगावे, याचे शिक्षण दिले आहे. त्यांचे साहित्यविश्वाला बहुमूल्य योगदान आहे, असे तावडे यांनी हे विधेयक मांडताना सांगितले. तसेच यत्या ११ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याच्या नामविस्ताराचा कार्यक्रम करण्याचेही जाहीर केले. एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, गणपतराव देशमुख, मंदा म्हात्रे आदींनी समर्थन केले.बहिणाबार्इंच्या नावाने अध्यासन व्हावेया विधेयकाचे सर्वच पक्षांनी समर्थन केले. यावर बोलताना अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी विद्यापीठात बहिणाबार्इंच्या नावाने अध्यासन सुरू करण्याची मागणी केली. यावर तावडे यांनी विद्यापीठात बोलीभााषा विभाग सुरू करण्याबाबत विचार केला जाईल असे सांगितले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:19 IST
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव’ असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये मांडले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव
ठळक मुद्देविधानसभेत एकमताने विधेयक मंजूर