नागपूर : दागिन्यांच्या मजुरीवर विशेष सूट असणारी २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजना पु. ना. गाडगीळ आणि सन्स अर्थात पीएनजी सन्सने जाहीर केली असून पहिल्या दिवसापासून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये २२ कॅरेट सोन्याचे पैसे भरून भाव बुक करता येईल व घडणावळीवर २५ टक्के सवलत मिळेल. योजना ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील पीएनजी सन्सच्या सर्व दालनांत उपलब्ध आहे, असे पीएनजी सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ यांनी सांगितले. पीएनजी सन्सचे संचालक-सीईओ अमित मोडक म्हणाले, २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजनेत एकदाच रक्कम भरता येईल व किमान गुंतवणूक १० हजार रुपयांपासून आहे. पुन्हा रक्कम भरायची असल्यास नव्याने भाव बुक होईल. बँकिंग कालावधीत म्हणजे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत योजना खुली असेल. जमा रकमेपेक्षा अधिकच्या दागिने खरेदीवर कोणतीही सूट नसेल.
पीएनबी सन्सची सोने गुंतवणूक,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST