शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी खड्डे बुजवा; मैदानात डस्टची व्यवस्था करा, सहायक आयुक्तांकडे मागणी

By गणेश हुड | Updated: September 5, 2023 15:45 IST

लक्ष्मीनगर झोनमधील सार्वजनिक गणेशात्सव मंडळांची मागणी

नागपूर : १९ सप्टेंबरला गणरायांचे  निर्विघ्न आगमण व्हावे, भक्तांना गणेशोत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवनगी तातडीने देण्यात यावी. महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी मिरवणुकीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, मैदानात पाणी साचणार नाही. यासाठी डस्टची व्यवस्था करावी. रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्या अशी मागणी लक्ष्मीनगर झोनमधील सार्वजनिक गणेशात्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी सहायक आयुक्त मिलींद मेश्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली. 

मंडळ परिसरातील सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या गवताची कटींग करण्यात यावी. रस्त्यावरील व गणेश मंडळ परिसरातील पथदिवे सुरू राहतील अशी व्यवस्थ करा, मंडळांना तातडीने परवानगी मिळेल अशी व्यवस्था करा, विसर्जन कुंडाजवर विद्युत व्यवस्था करा, तात्या टोपे नगर ते प्रताप नगर सिमेंट रोड तसेच देवनगर या सिमेंट रस्त्यांचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा, वाहतूक वळविल्याने दत्ता मेघे कॉलेज, एनआयटी कॉलनी, अत्रे ले-आऊट , गिट्टीखदान ले-आऊट, इनकम टॅक्स कॉलनी, एस.ई.रेल्वे कॉलनी. फेन्ड्स कॉलनी परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात शिष्टमंळाने सहायक आयुक्तांशी चर्चा केली.

शिष्टमंडळात साहस गणेशोत्सव मंडळाचे गोपाल बोहरे, श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनचे निलेश राऊत, तात्याटोपे नगर नागरिक मंडळाचे शौनक जहागिरदार, युवा संकल्प गणेशोत्सव मंडळाचे आशुतोष भगत, नवयवक गणेश उत्सव मंडळाचे आदित्य बनकर, युवक गणेश उत्सव मंडळाचे देवा डेहनकर, बाल गणेशोत्सव मंडळाचे सारंग कदम, श्री विघ्नहर्ता बाल गणेश उत्सव मंडळाचे प्रणय तरार आदींचा समावेश होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर