शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याचा कट पोलिसांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्वेलर्स लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार सशस्त्र गुंडांना यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ज्वेलर्स लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार सशस्त्र गुंडांना यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. शेख सुलतान शेख मोहम्मद (वय २४, रा. संघर्ष नगर), शेख वजीर शेख याकूब (वय २३, रा. संघर्ष नगर), शुभम ऊर्फ चुक्का छोटेलाल बिरहा (वय २६, रा. संतोष नगर) आणि दशरथ ऊर्फ गुस नरोत्तम शाहू (वय २३, रा. गरीब नवाज नगर) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

यशोधरा नगर पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्री संत नामदेव नगरात गस्त करीत असताना नाल्याजवळ त्यांना काही आरोपी संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेऊन उपरोक्त चौघांना पकडले. त्यांच्याकडून एक छर्ऱ्याची बंदूक, तीन तलवारी, मिरची पावडर आणि नायलॉन दोरी जप्त करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता, उपरोक्त आरोपी या परिसरातील एक ज्वेलर्सचे दुकान तसेच एटीएम फोडण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आरोपींनी दिली. आरोपीचे दोन साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

--

आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार

पोलिसांच्या हाती लागलेले आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, लूटमार तसेच हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.

--