शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानांना सार्वजनिक खाऊ घालण्यास मनाईला आव्हान; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 12:24 IST

भटक्या श्वानांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या घटना रोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या श्वानांना कोणीही सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नये, असा आदेश दिला होता.

नागपूर : भटक्या श्वानांना रोड, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी खायला घालू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्याविरुद्ध स्वाती चॅटर्जी व इतर दोन पशुप्रेमी महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

उच्च न्यायालयाने गेल्या २२ ऑक्टोबर रोजी वादग्रस्त आदेश दिला. भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालू नये. ज्यांना भटक्या श्वानांना खायला द्यायचे आहे, त्यांनी आधी श्वानांना दत्तक घ्यावे व त्यांची महानगरपालिकेत नोंदणी करावी किंवा त्यांना आश्रयगृहात ठेवावे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच धोकादायक श्वानांना ठार मारणे, त्यांची नसबंदी करणे व त्यांना आश्रयगृहात ठेवणे याविषयी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे आणि पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करावी, असेही उच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे.

वादग्रस्त आदेशामुळे भटके श्वान व त्यांची काळजी घेणाऱ्या नागरिकांचे अधिकार बाधित झाले आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाले आहे. वादग्रस्त आदेशानंतर महानगरपालिकेने भटक्या श्वानांची धरपकड सुरू केली आहे. ही कारवाई करताना भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली केली जात आहे. भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला देण्यास मनाई करणारा कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही. करिता, वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयdogकुत्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय