नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वप्नसुंदरीच्या थाटात त्या हवाई प्रवास करतात. विमानतळापासूनच त्यांची खिदमत सुरू होते. महागडे हॉटेल आधीच ठरलेले असते. तेथे त्या विसावतात. तेथूनच मग रात्रीच्या खेळाला सुरुवात होते. काही तासातच हजारोंची उलाढाल होते. नव्याने पुन्हा खेळ रात्रीचा (दिवसाच) सुरू होतो. होय, अनेक शहरात हा खेळ रंगत असून देशातील विविध भागातून सेक्स वर्कर्सना बोलावून ठिकठिकाणचे एजंट आंबटशौकीन मंडळीची ''स्वप्नपूर्ती'' करतानाच लाखोंची उलढाल करीत आहेत.कोरोनामुळे सर्व व्यापार व्यवसाय ठप्प पडले आहेत. सर्वच उद्योग - व्यवसायांना उभारी घ्यायला वेळ लागणार आहे. मात्र, देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय होता त्याच जोमाने पुन्हा सुरू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात स्थानिक पोलिसांनी नजरेत आलेल्या डझनभर हायप्रोफाईल सेक्स वर्कर्स पकडल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, इंदूर, ग्वाल्हेर, राजस्थानमधून आलेल्या आणि नागपूर पोलिसांनी पकडलेल्या या कारवाईतून उघड झालेली माहिती चक्रावून टाकणारी आहे.कनेक्टींग नेटवर्कया गोरखधंद्यातील दलालांचे नेटवर्क देश-विदेशातील वारांगनाशी कनेक्टेड आहे. नेपाळी, रशियन बालांसोबत देशातील कोणत्याही प्रांतातील वारांगना त्यांच्याकडे उपलब्ध असतात. दलालांच्या व्हॉटस्पप ग्रुपमध्ये त्या बघायला मिळतात. एका दलालाकडून दुस-या दलालांकडे त्यांचा प्रवास सुरू असतो. प्रत्येक महानगरातील दलालाचे रेट वेगवेगळे असतात. एक, दोन किंवा तीन आठवड्यांच्या करारावर या वारांगना मोठमोठ्या महानगरात जात असतात.असा असतो कॉन्ट्रॅक्टसूत्रांच्या माहितीनुसार, ३ हजारांपासून तो १० हजारांपर्यंत प्रत्येकीचा रोजचा (रशियन बालांचा जास्त) दर असतो. विशिष्ट मुदतीसाठी करार करून दलाल त्यांना आपल्या महानगरात बोलावून घेतो. ती विमानातून सफर करते. महागड्या हॉटेलमध्ये राहते. आलीशान कार तिच्या दिमतीला असते. दलाल त्यांना कधी या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये, कधी बंगल्यात, कधी सदनिकेत तर कधी फार्म हाऊसमध्ये पोहचवतात. दलाल त्या ग्राहकाकडून किती रक्कम घेतो, त्याच्याशी तिला देणेघेणे नसते. ती उच्चभ्रू ग्राहकाला सेवा देते अन् दलाल तिच्या माध्यमातून रोज हजारो रुपये पदरात पाडून घेतो.
रात्रीस खेळ चाले ... नागपुरात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:26 IST
sex scam देशातील विविध भागातून सेक्स वर्कर्सना बोलावून ठिकठिकाणचे एजंट आंबटशौकीन मंडळीची ''स्वप्नपूर्ती'' करतानाच लाखोंची उलढाल करीत आहेत.
रात्रीस खेळ चाले ... नागपुरात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय
ठळक मुद्देहवाई सफर, महागडे हॉटेल... सारेच आलिशान, स्वप्नपूर्तीतून लाखोंचे वारेन्यारे