शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रंग खेळा, मात्र जपून : डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:26 IST

‘बुरा न मानो होली है.’ म्हणत लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण होळीच्या निमित्ताने केली जाते. अतिउत्साहात या रंगांची उधळण मुक्तहस्ताने होताना नेहमीच दिसते. मात्र, हा अतिउत्साह काही जणांना घातक ठरू शकतो, म्हणूनच होळी खेळा, पण जपून असा सल्ला मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देधुळवडीत डोळ्याला इजा झालेल्यांची संख्या असते अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘बुरा न मानो होली है.’ म्हणत लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण होळीच्या निमित्ताने केली जाते. अतिउत्साहात या रंगांची उधळण मुक्तहस्ताने होताना नेहमीच दिसते. मात्र, हा अतिउत्साह काही जणांना घातक ठरू शकतो, म्हणूनच होळी खेळा, पण जपून असा सल्ला मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील डॉक्टरांनी दिला आहे.होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला रंग खेळण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात रंगांची खरेदी होताना दिसत आहे. रंगांमध्ये वापरण्यात येणारे केमिकल्स हे कुठचे आहेत, किती प्रमाणात वापरलेत याची नोंद रंगांच्या पाकिटावर नसते. ग्राहकही हे रंग खरेदी करताना ते कशापासून तयार केले आहेत, कुठे तयार केले आहेत याचा विचार करताना दिसत नाहीत. याचा परिणाम धुळवडीला रंग खेळल्यावर दिसून येतो. जास्त केमिकल्स रंगांमध्ये असल्यास त्वचा, डोळे, कान, घसा यांना त्रास होऊ शकतो. दरवर्षी धुळवडीनंतर डोळ्याला इजा झालेले, कानाला इजा झालेले रु ग्ण रु ग्णालयात दाखल होतात. रासायनिक कारणामुळे डोळ्यात होणाऱ्या इजांमध्ये १८ टक्के प्रमाण हे होळी हलगर्जीपणे खेळण्यामुळे होतात. कोणत्याही सणाचा आनंद लुटा; मात्र, या आनंदाचा बेरंग होऊ देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी लोकांना दिला आहे. रंगांमुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेला खाज सुटणे, डोळे लाल होणे, कान सुजणे असा त्रास लोकांना होतो. काही जणांना यामुळे डोळे गमवावे लागतात तर काही जणांना कानाच्या पडद्याचा त्रास होतो. म्हणून नैसिर्गक किंवा साध्या रंगांचा वापर करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.रंगाचे फुगे धोकादायककृत्रिम रंगांमध्ये काही धोकादायक रंगद्रव्ये व पदार्थ आढळतात. यात वाळू, काच पावडर आणि शिसे यासारखे पदार्थ डोळ्यास इजा किंवा अंधत्व देऊ शकतात. चमकी असलेल्या रंगामध्ये काचेसारखे पदार्थ असतात. ज्याने बुबुळावर जखम होऊ शकते, डोळा लाल होऊ शकतो व पाणी येऊ शकते. म्हणून रंग खेळताना गॉगल लावावा. रंगांचे फुगे सर्वात जास्त धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव किंवा लेन्स सरकू शकते किंवा मागचा पडदा (रेटिना) फाटू शकतो यामुळे नजर पूर्णपणे जाऊ शकते. या आकस्मिक अपघाताकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.डॉ. अशोक मदान,विभाग प्रमुख नेत्ररोग विभाग, मेडिकल

 

टॅग्स :Holiहोळीdoctorडॉक्टर