शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस आॅफ विदर्भ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 21:54 IST

नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अ‍ॅण्ड म्युझिकल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस आॅफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ आॅगस्टला होणार असून, येत्या २१ व २२ जुलैला स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देमहापालिका व लकी इव्हेन्टसतर्फे आयोजन : २१ व २२ जुलैला प्राथमिक फेरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अ‍ॅण्ड म्युझिकल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस आॅफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ आॅगस्टला होणार असून, येत्या २१ व २२ जुलैला स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.१४ वर्षांवरील व १४ वर्षांखालील अशा दोन वयोगटात ही स्पर्धा होणार असून, प्राथमिक फेरीमध्ये ज्येष्ठ गायक कलावंतांनाही सहभागी होता येणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय, असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील उदयोन्मुख व प्रतिभावंत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा स्पर्धेचा उद्देश आहे. यावर्षी क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येईल. गीत, गायन, अभिनय क्षेत्रातील कलावंतांना या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे नागेश सहारे यांनी सांगितले. स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा समिती सदस्यांसह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, विजय चिवंडे आदी सहकार्य करीत आहेत. स्पर्धेला मानव सुधार प्रन्यास संस्थेसह आदित्य-अनघा बँक आणि युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन यांचे सहकार्य लाभले आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील उदयोन्मुख कलावंतांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका सरला नायक, दर्शनी धवड उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcultureसांस्कृतिक