शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्लास्टिकची विल्हेवाट लावा अन्यथा कारवाई; नागपूर आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:14 IST

अधिसूचनेपासून महिना भरात बंदी असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावावयाची आहे. यासाठी नागपूर महापालिकेच्या झोन कार्यालयांच्या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले आहे.

ठळक मुद्दे२३ एप्रिलपर्यंत मुदतझोन स्तरावर संकलन केंद्र, वापर वा विक्री केल्यास २५ हजारांपर्यंत दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने प्लास्टीकपासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्या, थर्माकॉल व प्लास्टीकपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घातली आहे. शिल्लक असलेला प्लास्टीच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. कायद्यात बंदी घातलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंचे उत्पादन, साठा, विक्री तसेच वापरणाऱ्यांवर ५ ते २५ हजारापर्यंत दंड व तीन महिन्यांची शिक्षा केली जाणार आहे.महाराष्ट्र प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंची उत्पादने (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवण) अधिसूचना, २३ मार्चपासून लागू झाली आहे. अधिसूचनेपासून महिना भरात बंदी असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावावयाची आहे. यासाठी महापालिकेच्या झोन कार्यालयांच्या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले आहे. ज्यांच्याकडे बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा आहे त्यांना हा साठा राज्याबाहेर विकण्यास मुभा दिली आहे. तसेच संकलन केंद्रावरही प्लास्टीकच्या वस्तू देता येतील. घरोघरी कचरा संकलन करणाऱ्यांना पॅकिंगमध्ये व कचरा गोळा करणाऱ्यांकडे संबंंधितांना अशा वस्तू देता येतील. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लस्टीक पिशव्या वापरण्यावर आधीच बंदी आहे. बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर व विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई नियमित कारवाई सुरु आहे. परंतु यातून प्लास्टीकचे समस्या सुटलेली नाही.

५ ते २५ हजारापर्यंत दंड व शिक्षाबंदी असलेल्या प्लास्टीक पिशव्या वा थर्माकोलचा वापर वा विक्री केल्यास संबंधितावर पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार व तिसऱ्यांना प्लास्टीकचा वापर वा विक्री करताना आढळून आल्यास २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची शिक्षा होऊ शकते. यामुळेच बंदी असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.विहीत मुदतीनंतर कारवाईराज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार प्लास्टीक बंदीच्या निर्णयाची महापालिका स्तरावर अंमलजावणी केली जाणार आहे. बंदी असलेल्या प्लास्टीक व थर्माकॉलच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी २३ एप्रिलपर्यत मुदत देण्यात आली आहे. यासाठी झोन स्तरावर प्लास्टीक संकलन केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कचरा वेचणाऱ्यांना महापालिकेने ओळखपत्र दिले आहे. अशा अधिकृत व्यक्तीकडे प्लास्टीच्या वस्तू विकू वा जमा करू शकतील. निर्धारित कालावधीत जमा असलेला साठा दुसऱ्या राज्यात विकण्याला मुभा आहे. विहित मुदतीनंतर बंदी असलेल्या प्लास्टीक वा थर्माकॉलच्या वस्तू आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिके च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.- अश्विन मुदगल, आयुक्त महापालिका

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी