शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

आयुक्तांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोळा केला प्लास्टिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:24 IST

महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयातून बुधवारी सकाळी आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात अधिकारी , कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी हातात पोते घेऊन रस्त्यावर निघाले. रस्त्यावर पडलेला प्लास्टिकचा कचरा स्वत: मनपा आयुक्तांनी उचलत नागरिकांनाही प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देस्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ‘प्लाग रन’ : ‘प्लास्टिकमुक्त नागपूर’साठी नागरिकांचाही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयातून बुधवारी सकाळी आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात अधिकारी , कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी हातात पोते घेऊन रस्त्यावर निघाले. रस्त्यावर पडलेला प्लास्टिकचा कचरा स्वत: मनपा आयुक्तांनी उचलत नागरिकांनाही प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी पुढाकार घेतल्याने नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले. नागरिकांनी ‘प्लास्टिकमुक्त नागपूर’साठी सुरू करण्यात आलेल्या जनजागरण मोहिमेत पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.महापालिकेंतर्गत ११ सप्टेंबर ते २७ ऑ क्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी नागपूर महापालिका आणि स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, तसेच मनपाच्या दहाही झोन कार्यालयाच्या वतीने ‘प्लॉग रन’चे आयोजन करण्यात आले . मनपा मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात अभिजित बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरिता कामदार, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, योगपटू धनश्री लेकुरवाळे, योगशिक्षक मोरेश्वर वरघने, भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडू गुरुदास राऊत, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, हिवताप अधिकारी जयश्री थोटे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, ऑरेंज सिटी रनर्स असोशिएशनचे अमित पंचमठिया व सदस्य, गांधीबाग स्केटिंग क्लबचे स्वप्नील समर्थ यांच्यासह मनपाचे अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रारंभी सर्व उपस्थितांना प्लास्टिकमुक्त नागपूर शहर साकारण्यात आपण सहभागी होऊ या आशयाची शपथ राम जोशी यांनी दिली. यानंतर मोरेश्वर वरघने आणि धनश्री लेकुरवाळे यांनी जीवनात योगाचे महत्त्व सांगत प्रात्यक्षिके करून दाखविली. उपस्थितांनीही योगा करीत सुदृढ आयुष्याचे धडे घेतले. यानंतरअभिजित बांगर यांच्या नेतृत्वात व राम जोशी यांच्या मार्गदर्शनात मनपापासून प्लॉग रनला सुरुवात झाली. सर्वात पुढे गांधीबाग स्केटिंग क्लबचे स्केटर्स हातात ‘से नो टू प्लास्टिक’, ‘प्लास्टिकला आयुष्यातून हद्दपार करा’ असे संदेश असणारे फलक घेऊन प्लॉग रनचे नेतृत्व करीत होते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन, रा.पै. समर्थ स्मारक समिती, ऑरेंज सिटी रनर्स असोशिएशनचे स्वयंसेवक प्लॉग रनमध्ये सहभागी झाले होते. चेहऱ्यावर मास्क, हातात मोजे घालून अधिकाऱ्यांसह सर्व स्वयंसेवक रस्त्यावर पडलेले प्लास्टिक जमा करीत होते. मनपा मुख्यालय, विधानभवन चौक, मिठा नीम दर्गा, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीसीए ग्राऊंड असे मार्गक्रमण करीत प्लॉग रन मनपा मुख्यालयात पोहोचली. प्लास्टिकमुक्तीच्या घोषणा देत जमा केलेले प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.दहाही झोनमध्ये प्लास्टिकमुक्त अभियानमनपाच्या दहाही झोन कार्यालयामध्ये प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी प्लॉग रन आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर अंतर्गत धंतोली उद्यान, सावरकर नगर चौक येथे, धरमपेठ झोन अंतर्गत अंबाझरी उद्यान, वर्मा ले-आऊट येथे, हनुमान नगर झोनअंतर्गत दुर्गा नगर स्कूल, जवाहन नगर परिसरात, धंतोली झोन अंतर्गत सुभाष रोड उद्यान, नेहरूनगर झोनअंतर्गत दत्तात्रय नगर उद्यान, गांधीबाग झोन अंतर्गत गांधीबाग उद्यान मार्केट, सतरंजीपुरा झोनअंतर्गत शांतीनगर उद्यान, शांतीनगर परिसरात, लकडगंज झोनअंतर्गत आंबेडकर उद्यान, आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू परिसरात, आसीनगर झोनअंतर्गत वैशाली नगर उद्यान, मंगळवारी झोनअंतर्गत मंगळवारी बाजार, जरीपटका मार्केट येथे मनपा उपायुक्त आणि झोन सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात ‘प्लॉग रन’चे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून जमा झालेले प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. यापुढे सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करीत उपस्थितांना शपथ देण्यात आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMahatma Gandhiमहात्मा गांधी