शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदी : झोनच्या पथकाचा ठावठिकाणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:00 IST

राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोनस्तरावर पथक गठित केले होते. २३ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली. २५ मार्च २०१९ पर्यंत एकूण ६५१ प्रकरणात ३२ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुन्हे दाखल करण्यात आले तसेच ९४ जणांना नोटीस बजावण्यात आल्या. या कालावधीत २३,२७३ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. एकूण १३,१७३.४४० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. यातील जेमतेम सात प्रकरणात झोनच्या पथकांनी कारवाई केली. मागील काही महिन्यात झोन स्तरावरील पथकांचा ठावठिकाणा नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देउपद्रव शोध पथकाच्या भरवशावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोनस्तरावर पथक गठित केले होते. २३ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली. २५ मार्च २०१९ पर्यंत एकूण ६५१ प्रकरणात ३२ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुन्हे दाखल करण्यात आले तसेच ९४ जणांना नोटीस बजावण्यात आल्या. या कालावधीत २३,२७३ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. एकूण १३,१७३.४४० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. यातील जेमतेम सात प्रकरणात झोनच्या पथकांनी कारवाई केली. मागील काही महिन्यात झोन स्तरावरील पथकांचा ठावठिकाणा नसल्याचे निदर्शनास आले आहे.३२ लाखांच्या दंड वसुलीत झोन पथकांचा फक्त ३३,८०० रुपयांचा वाटा असून, २४.२०० किलो प्लास्टिक जप्त केले. प्लास्टिक जप्तीची कारवाई प्रामुख्याने उपद्रव शोध पथकांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे झोनस्तरावरील पथके कुठे गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे प्लास्टिकची विक्री व वापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी उपद्रव शोध पथक व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकांनी लकडगंज झोनमध्ये संयुक्त कारवाई करून ३५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.उपद्रव शोध पथकात माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक झोनस्तरावर दोन स्वच्छतादूतांची नियुक्ती करावयाची होती. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. पथकात फक्त ४० स्वच्छतादूत कार्यरत असल्याने कारवाईला गती मिळालेली नाही. अनेकदा जप्त केलेल्या पिशव्या उचलण्यासाठी कर्मचारी मिळत नाही.पिशव्यांची खुलेआम विक्रीप्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापरावर बंदी असूनही याचा खुलेआम वापर व विक्री होत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन बंद असल्याचा दावा केला जात आहे. मग शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या येतात कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्लास्टिक पिशव्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या माध्यमातून शहरात येतात. याचा साठा करून विश्वासातील लोकांनाच याची विक्री केली जाते. झोनच्या अधिकाऱ्यांना याची माहिती आहे. परंतु कारवाई केली जात नाही.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी