लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्याप्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, असे मत माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी शनिवारी मांडले.वनराई फाऊं डेशन व तेजस्विनी महिला मंचतर्फे श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित खरी-खरी प्लास्टिकबंदी आवश्यक की अनावश्यक या विषयावरील चर्चासत्रात जयस्वाल बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे गिरीश गांधी होते. व्यासपीठावर नीरीचे संशोधक डॉ. अतुल वैद्य, उद्योजक रमेश मंत्री, पर्यावरण कार्यकर्ते पराग करंदीकर, मकरंद पांढरीपांडे, अजय पाटील, महिला मंचच्या अध्यक्ष किरण मुंदडा आदी उपस्थित होते.गौण खनिजांचे उत्खनन करताना खनिकर्म विभागात प्राप्त होणाऱ्या महसुलातील २० टक्के निधी हा पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करणे आवश्यक आहे. परंतु राज्यात हा निधी खर्च केला जात नाही. औद्योगिक विकासात प्रदूषण अटळ आहे. याला आळा घालण्यासाठी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे जयस्वाल म्हणाले.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा पर्यावरणासाठी घातकच असतो. असेच प्लास्टिकच्या अतिवापराचे दुष्परिणाम होत आहे. नागरिकांनी प्लास्टिक वापराचा अतिरेक टाळावा. यासाठी राज्य शासनाने घेतलेला प्लास्टिकबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे प्रतिपादन अतुल वैद्य यांनी केले. विकसित देशात भारताच्या तुलनेत प्लास्टिकचा वापर अधिक आहे. परंतु प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. मात्र आपल्या देशात वापर कमी असूनही प्लास्टिकमुळे समस्या निर्माण झाली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे अतुल वैद्य म्हणाले.प्लास्टिकबंदीचा निर्णय योग्यच आहे. नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. लोकांनी या निर्णयाचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन मकरंद पांढरीपांडे यांनी केले. प्लास्टिकबंदी ही लोकचळवळ झाल्याशिवाय यशस्वी होणार नाही, असे मत गिरीश गांधी यांनी मांडले. प्रास्ताविक किरण मुंदडा यांनी तर सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार कल्पना मोहता यांनी मानले.
प्लास्टिकबंदी; उशिरा सुचलेले शहाणपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:13 IST
पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, असे मत माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी शनिवारी मांडले.
प्लास्टिकबंदी; उशिरा सुचलेले शहाणपण
ठळक मुद्देआशिष जयस्वाल : ‘खरी-खरी प्लास्टिीकबंदी आवश्यक की अनावश्यक’ यावर चर्चा