शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

५०० अतिगंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:35 IST

वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे.

ठळक मुद्देजगात पहिल्यांदाच ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणीमेडिकलकडे जबाबदारी

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोविड-१९’वर जगात कोणतेही अँटि-व्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. या भीषण परिस्थिीत रुग्णाचा उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उम्मेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. यात गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे.जगात एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांवर व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णावर पहिल्यांदाच चाचणी होणार आहे. याची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात कोविड-१९ची ९०,७८७ प्रकरणे तर ३,२८९ मृत्यू आहेत. जवळपास १५ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरतीची आवश्यकता आहे आणि सुमारे ५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सचिव डॉ. संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणी राबविण्यास पुढाकार घेतला आहे.विशेष म्हणजे, ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) वतीने देशातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘प्लाझ्मा थेरपी’ चाचणीवर संशोधन सुरू आहे. परंतु ही चाचणी मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर आहे. यातही साधारण २५० रुग्णांचा समावेश केला जाणार आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चाचणीमध्ये ५०० गंभीर रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. यात राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात पथकडॉ. संजय मुखर्जी व डॉ. लहाने यांनी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ची जबाबदारी नागपूरच्या मेडिकलवर सोपविली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले आहे. यात पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम हे या चाचणीचे प्रमुख अन्वेषक आणि संयोजक आहेत. आर्थाेपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. मो. फैजल हे राज्य नोडल अधिकारी व प्रभारी अधिकारी आहेत.

बरे होण्याचा दर व मृत्यूदराचे निरीक्षणराज्यातील साधारण २३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५०० गंभीर रुग्णांवर ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणी केली जाणार आहे. या सर्वांचा डाटा नागपूर मेडिकल गोळा करून बरे होण्यचा दर व मृत्यूदरावर निरीक्षण करणार आहे. याचे डाक्युमेन्टेशन तयार केले जाईल. त्यापूर्वी या प्रकल्पासाठी आवश्यक दस्तावेज विविध संस्थांची मंजुरी घेतली जात असून ती अंतिम टप्प्यात आहे.

काय आहे चाचणीयात कोविडमधून बरा होऊन २८ दिवस कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीच्या रक्तामधून प्लाझ्मा घेतले जाणार आहे. अशा व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अ‍ॅन्टीबॉडीज मुबलक असतात. हे अ‍ॅन्टीबॉडीज गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचा रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जाण्यावरील हे संशोधन आहे.

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ ही जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी चाचणी असेल. मोठ्या संख्येत जीव वाचविण्यास मदत करेल. ही उपचार पद्धती पूर्णत: नि:शुल्क आहे.-डॉ. संजीव मुखर्जी सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग कोट...ही चाचणी प्लाझ्माच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास मदत करेल. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये या प्रकल्पाचे मार्गदर्शक असतील.-डॉ. तात्याराव लहाने संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :Healthआरोग्य