शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी तात्काळ नियोजन करा  : पालकमंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:22 IST

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

ठळक मुद्देआराखडा तयार करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढल्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढणार आहे. या परिस्थितीत प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. किराणा, भाजीपाला, दूध, औषधी, आरोग्य सेवा व कम्युनिटी किचन या बाबींचा आराखड्यात प्राधान्याने समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज बुधवारी पालकमंत्री राऊत यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा उपस्थित होते.लॉकडाऊन वाढल्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भोजनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. यासाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी. नागरिकांना लागणारे भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित करावे. सामाजिक संस्थांना यासाठी निधी देण्यात येईल. यावर पोलीस विभागाने नियंत्रण ठेवावे. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी बँक ांतील व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.वैद्यकीय साधनांच्या खरेदीसाठी आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाखकोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लागणारी वैद्यकीय साधने घेण्यासाठी आमदार निधीमधून प्रत्येकी ५० लाख निधी घेणेबाबत सर्व आमदारांना पत्र लिहावे, असे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. आपत्तीशी लढा देताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उपाययोजना व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.रेशनकार्ड व आधार कार्ड नसलेल्यांनाही मिळावे धान्यज्यांच्याकडे आधारकार्ड आहे पण रेशनकार्ड नाही तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड व आधारकार्डही नाही अशा नागरिकांना किराणा धान्य किट देण्याबाबत नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागात किराणा धान्य किट वाटपाचे काम योग्य पद्धतीने सुरु असून शहरात वाटपाचे नियोजन आवश्यक असल्याचे पालकमंत्री राऊत म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतguardian ministerपालक मंत्री