शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपुरातील कचऱ्यापासून वीज तयार करण्याची योजना संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:06 IST

कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, तातडीने काम सुरू न झाल्यास ते महापालिकेला करार रद्द करण्याची शिफारस करतील.

ठळक मुद्देगडकरींनी घेतला एस्सेलच्या अधिकाऱ्यांचा क्लास : काम सुरू न झाल्यास रद्द होणार करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, तातडीने काम सुरू न झाल्यास ते महापालिकेला करार रद्द करण्याची शिफारस करतील.भांडेवाडीमध्ये प्रस्तावित या प्रकल्पासाठी मनपा, एस्सेल व हिताचीने जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापित केली होती. याअंतर्गत मनपाकडून दर दिवशी मिळणाऱ्या ८०० टन कचऱ्यापासून ११.५ मेगावॅट विजेचे उत्पादन करण्याचा विचार आहे. महावितरण या प्रकल्पातील वीज ७ रुपये युनिटच्या दराने खरेदीसाठी तयार होते. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये १ रुपये दरानुसार भांडेवाडी येथे १० एकर जागा १५ वर्षांसाठी वितरित केली होती. यात केवळ इतकीच अट होती की, या जमिनीचा उपयोग वीज प्रकल्पाशिवाय इतर कुठल्याही कामासाठी होणार नाही. या जमिनीचा उपयोग कर्ज घेण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठीसुद्धा करता येऊ शकत नाही.सध्या अनेक प्रयत्नानंतरही ही योजना साकार होत नव्हती. सूत्रानुसार या प्रकल्पातील सर्वात मोठे संकट म्हणजे ऑपरेटरला देण्यात येणाऱ्या शुल्कामुळे निर्माण झाले आहे. महापालिकेने सॉलिड वेस्टचे टिपिंग शुल्क ७५० रुपये प्रति टनावरून कमी करून २२५ रुपये केले आहे. कारण यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑपरेटरला ९६.२२ कोटी रुपये मिळणार आहेत.अनेक कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरीमनपा सूत्रानुसार एस्सेलने या प्रकल्पासाठी एक कार्यालय सुरू केले होते. काही कर्मचारीसुद्धा नियुक्त करण्यात आले होते. परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांनी नंतर नोकरी सोडली. या प्रकल्पासाठी सध्या केवळ प्रकल्प संचालक जीवन सोनवणे हेच कार्यरत आहेत.दोन वर्षात पूर्ण होणार प्रकल्पया प्रकल्पासंदर्भात दाखल याचिकेवर उत्तर सादर करताना मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असे आश्वासन दिले आहे की, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून, दोन वर्षात काम पूर्ण करण्यात येईल.सहा आठवड्यात सुरू होणार कामनितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेलचे सीईओ संदीप चमोनिया व अध्यक्ष कमल माहेश्वरी यांना स्पष्टपणे सांगितले की, प्रकल्पाचे काम तातडीने सुरू झाले नाही तर करार रद्द करून दुसऱ्या कंपनीला काम सोपविले जाईल. एस्सेलच्या अधिकाऱ्यांनी चार ते सहा आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. माहेश्वरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, प्रकल्पाचे काम सुरू आहे. कार्यालयसुद्धा सुरू आहे. आता कामाला गती देण्यात येईल. मनपा आयुक्तांनाही याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectricityवीज