शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 22:51 IST

वेळोवेळी आवश्यक आदेश देऊनही सीताबर्डीतील हॉकर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देनवीन अधिकाऱ्यांना प्रतिवादी केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेळोवेळी आवश्यक आदेश देऊनही सीताबर्डीतील हॉकर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला.या अधिकाऱ्यांमध्ये नवीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त झोन-२ विनीता शाहू, सीताबर्डी पोलीस निरीक्षक पी. एन. राजपूत, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व धंतोली झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांचा समावेश आहे. यासंदर्भात सीताबर्डी मर्चंट असोसिएशनची अवमानना याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. असोसिएशनने त्यात दुरुस्ती अर्ज सादर करून या अधिकाऱ्यांना प्रकरणात प्रतिवादी केले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सीताबर्डीतील परिस्थितीत समाधानकारक बदल झाला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाले आहे. सीताबर्डीतील हॉकर्सचे अतिक्रमण आजही कायम आहे. महानगरपालिकेने अद्याप हॉकर्स झोन तयार केले नाहीत याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर अवमानना कारवाई करण्याची मागणी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEnchroachmentअतिक्रमणSitabuldi square Nagpurसीताबर्डी चौक