पिपळा (डाक बंगला): राज्यात २०२१ मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीकडे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचे लक्ष लागले आहे. या भरती प्रक्रियेत ग्रामीण भागातील युवक-युवतींना संधी मिळावी यासाठी पिपळा डाकबंगला ता.सावनेर येथील बाबा आमटे युवा पार्क येथे पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात आले आहे. या शिबिरात पिपळा (डाकबंगला), इसापुर, वलनी, गोसेवाडी, खापा (पाटण), सिल्लेवाडा, सद्भावनानगर, दहेगाव (रंगारी), पाटणसावंगी, भन्साळी टाकळी, कुसुंबी, एरणगाव परिसरातील युवक आणि युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आशिष नागठाणे, विनोद कुंभलकर, मंगेश कळंबे, राजू रेवतकर,चंद्रभान वडकी, मंगेश ठाकरे, योगेश पाटील आणि फिटनेस अकादमीचे प्रशिक्षक परिश्रम घेत आहेत.
पिपळा डाक बंगला येथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:18 IST