शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पिंकी सिंग; नागपुरातील मजुरांच्या आयुष्यातील आशेची पणती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 10:40 IST

मजूर कुटुंबातील मुलांच्या, महिलांच्या आयुष्यात आरोग्याचा, शिक्षणाचा प्रकाश पोहचविण्याचा प्रयत्न करतेय. पिंकी सिंग अशी या कर्मयोगिनीची ओळख.

ठळक मुद्देजन्म हाती नव्हता पण तिने निवडले श्रमाचे श्रेष्ठत्व

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मनुष्य जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो. मग समाजालाही कर्माचे हे श्रेष्ठत्व स्वीकारावेच लागते. ‘ती’ या कर्म श्रेष्ठत्वाचे प्रतीक. बदनाम समजल्या जाणाऱ्या वस्तीत तिचा जन्म झाला खरा, पण पांढरपेशा कुलीनांपेक्षाही श्रेष्ठ संस्काराचे प्रकाशपुंज तिच्यात होते. या छोट्या प्रकाशपुंजाला एका कर्मयोगीच्या संस्काराचा आधार मिळाला. या आधाराने ती शिकली, मोठी झाली. समाजसेवेचा वसा तिने स्वीकारला. हा वसा तिला खदानीत काम करणाऱ्या मजुरांच्या अंधारलेल्या संसारापर्यंत घेऊन गेला. आता ती या मजूर कुटुंबातील मुलांच्या, महिलांच्या आयुष्यात आरोग्याचा, शिक्षणाचा प्रकाश पोहचविण्याचा प्रयत्न करतेय.पिंकी सिंग अशी या कर्मयोगिनीची ओळख. रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमात वाढली. विमलाश्रमात राहणाऱ्या मुलांना शहरातील झोपड्या आणि उच्चभ्रू वस्त्यांमधील समाजाचेवास्तव दाखवित रामभाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले. या मुलांच्या हस्ते वंचित घटकातील लोकांना कपडे वितरित करण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. अर्थातच या उपक्रमाचे नेतृत्व सर्वात मोठ्या पिंकीकडेच होते. एकेक वस्ती फिरताना या भावंडांची टीम पाचगाव खदानीत काम करणाऱ्या मजुरांच्या वस्तीपर्यंत पोहचली. येथून तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा प्रवास सुरू झाला. वर्ष होते २००२ चे. भावंडांना घेऊन पिंकी यांनी दर रविवारी झाडाखाली मुलांना गोळा करून शिकवणे सुरू केले. या काळात त्यांनी बीएसडब्ल्यू व एमएसडब्ल्यूची पदवी पूर्ण केली. त्यांच्या मैत्रिणी या सेवाकार्यात सामील होत गेल्या. शिक्षणासाठी सुरू केलेले काम येथील महिलांच्या स्वच्छतेपर्यंत पोहचले. सर्वांच्या सहकार्याने त्यांनी २००७ मध्ये मुलांसाठी निवासी शाळा सुरू केली व छोट्याशा कार्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. या कार्यात मामांचे (राम इंगोले) मार्गदर्शन व शाळेतील मुलांचा आईसारखा सांभाळ करणाऱ्या शोभा ठाकरे यांचा खंबीर आधार मिळाला.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस