शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाट लिलावावर जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:00 IST

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : नियम व कायदे वेशीला टांगून रेती घाटांचा लिलाव करण्याच्या अवैध पद्धतीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ...

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : नियमबाह्य कार्यप्रणालीची गंभीर दखल

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : नियम व कायदे वेशीला टांगून रेती घाटांचा लिलाव करण्याच्या अवैध पद्धतीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिकांवरील सुनावणीनंतर रेती घाटांच्या लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाने तिन्ही जिल्ह्यांतील वादग्रस्त रेती घाटांचे लिलाव रद्द केले. हा विषय जनहित याचिका म्हणून दाखल करून घेताना न्यायालयाने महसूल विभागावर कडक ताशेरेही ओढले. महसूल विभागाचे अधिकारी सार्वजनिक मालमत्तेचे विश्वस्त असतात. परंतु, त्यांची कृती या विश्वासाला छेद देणारी आहे असे न्यायालयाने म्हटले.३ जानेवारी २०१८ रोजी लागू रेती घाट उत्खनन धोरणानुसार तहसीलदारांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व रेती घाटांचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे व उप-विभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर उप-विभागीय अधिकाऱ्या ला त्यापैकी २५ टक्के तर, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याला १० टक्के रेती घाटांचे निरीक्षण करावे लागते. परंतु, हा नियम पाळण्यात येत नाही. तसेच, ग्रामसभांची परवानगीही मिळविली जात नाही. न्यायालयाने जनहित याचिका दाखल करून घेताना या सर्व बाबी लक्षात घेतल्या.

टॅग्स :sandवाळूHigh Courtउच्च न्यायालय