शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीवरील शेतमजूर महिलेची  जनहित याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:02 IST

काळाच्या ओघात तक्रारीचा मुद्दा निरर्थक ठरल्यामुळे नोटाबंदीवरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : तक्रारीचा मुद्दा ठरला निरर्थक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळाच्या ओघात तक्रारीचा मुद्दा निरर्थक ठरल्यामुळे नोटाबंदीवरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला.भंडारा येथील शेतमजूर उर्मिला कोवे यांनी ही याचिका दाखल केली होती. २४ नोव्हेंबर २०१६ पासून केवळ रिझर्व्ह बँकेतून ५०० व १००० रुपयाच्या जुन्या नोटा बदलवून घेण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यात आला होता. त्यावर याचिकाकर्तीचा आक्षेप होता. तो निर्णय नोटाबंदीच्या अधिसूचनेविरुद्ध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. ५०० व १००० रुपयाच्या जुन्या नोटा रद्द करण्याविषयी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यातील ३(सी) कलमामध्ये रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, विदेशी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नागरी सहकारी बँका व राज्य सहकारी बँकांमधून ३० डिसेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयाच्या जुन्या नोटा बदलवून अन्य वैध नोटा दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला ४००० हजार रुपयांपर्यंत जुन्या नोटा बदलवून मिळत होत्या. या तरतुदीत वेळोवेळी आवश्यक बदल झाले. दरम्यान, २४ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक वगळता अन्य सर्व बँकांमधून नोटा बदलवून देणे बंद करण्यात आले. त्यामुळे बँक खाते नसलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे जगणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेता ५०० व १००० रुपयाच्या जुन्या नोटा सर्व बँकांमधून बदलवून मिळण्याची सुविधा ३० डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे सरकारला निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती याचिकाकर्तीने न्यायालयाला केली होती. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणHigh Courtउच्च न्यायालय