शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

नागपुरात चित्रनगरी व्हायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:19 IST

शहर व विदर्भात अनेक चांगले नाट्यकलावंत आहेत. या कलावंतांच्या प्रतिभेला पंख द्यायचे असतील तर नागपुरात चित्रनगरी व्हायलाच हवी, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देभारत गणेशपुरे : 'मुक्तिदाता'ने जिंकला 'मालती करंडक'

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर व विदर्भात अनेक चांगले नाट्यकलावंत आहेत. या कलावंतांच्या प्रतिभेला पंख द्यायचे असतील तर नागपुरात चित्रनगरी व्हायलाच हवी, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली. डॉ.एम.के.उमाठे कॉलेजच्यावतीने सायंटिफिक सभागृहात शुक्रवारी आयोजित मालती करंडक एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर समाजसेविका सिंधूताई सपकाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, स्पर्धेचे परीक्षक किशोर आयलवार, डॉ. प्रवीण पारधी आणि अ‍ॅड.पराग लुले यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर उमाठे उपस्थित होेते. सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे भाषण केले. त्या म्हणाल्या, मी जग फिरले पण कोणत्याही देशात आपल्या देशाला माता म्हटले जात नाही. भारत एक असा देश आहे ज्याने आपल्या मातृभूमीला मातेचा दर्जा दिला आहे. प्रास्ताविक प्राचार्य डी. व्ही. नाईक यांनी केले. संचालन डॉ. मंजिरी पाठक तर आभार प्रा. मीरा मोरोणे यांनी मानले.‘नथिंग टू से’ द्वितीय,या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या ह्यमुक्तिदाताह्ण या एकांकिकेने ‘मालती करंडक’ पटकावला. डॉ़ एम. के़ उमाठे कॉलेजद्वारे सादर झालेल्या ‘नथिंग टू से’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट द्वितीय एकांकिकेचा पुरस्कार मिळाला.स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले़ या स्पर्धेत उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मोहता सायन्सतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘दुरुपयोग’ या एकांकिकेचा लेखक आकाश पौनीकर तर उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार जे़ डी़ कॉजेजच्या ‘खाप’ या एकांकिकेसाठी वैभव कामडी यास मिळाला. उत्कृष्ट प्रकाशयोजना-सी़ पी़ अ‍ॅण्ड बेरारतर्फे सादरीत ‘स्टॉप’ या एकांकिकेसाठी वृषभ धापोडकरला तर उत्कृष्ट नेपथ्याचा पुरस्कार ‘खाप’ एकांकिकेसाठी पीयूष मेहर व अनमोल चचाने यांना प्रदान करण्यात आला़ ‘मुक्तिदाता’ एकांकिकेचे दिग्दर्शक किशोर पगारे यास उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट अभिनय प्रथम ओमप्रकाश लांजेवार व मधुरा सामक यांना आणि द्वितीय पुरस्कार वैभव चौधरी व श्रेया जोशी यांना प्रदान करण्यात आला़