शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चित्रातून निसर्गाचे सौंदर्य मांडणारे प्रदर्शन

By admin | Updated: August 29, 2015 03:23 IST

निसर्ग नेहमीच माणसाला खुणावतो आणि निसर्गाच्या विविध स्वरूपातून मानवी भावनांवरही परिणाम होतो.

मनिषा पांढरीपांडे यांचे पेंटिंग्ज प्रदर्शन : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजन नागपूर : निसर्ग नेहमीच माणसाला खुणावतो आणि निसर्गाच्या विविध स्वरूपातून मानवी भावनांवरही परिणाम होतो. उंच पर्वतरांगात किंवा समुद्रकिनाऱ्यावर माणसाला त्याच्या खुजेपणाची जाणीव होते, गर्द वनराई, निळेशार शांत पाणी वेगळे आणि प्रवाहाचे पाणी वेगळे वाटते. निसर्गाच्या विविध रूपांचा मानवी भावनांशीही जवळचा संबंध आहे. ज्येष्ठ चित्रकार मनिषा पांढरीपांडे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन रसिकांना खेचणारे आहे. निसर्ग आणि त्याचे सौंदर्य नेमकेपणाने टिपणारे तसेच मनाला प्रसन्नतेचा अनुभव देणारे हे प्रदर्शन आहे. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन विजयकुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनीषा पांढरीपांडे आणि कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे यातील सर्व पेंटिंग्ज जलरंगाच्या माध्यमातून काढण्यात आली आहेत. पण जलरंगाचा उपयोग पांढरीपांडे यांनी मोठ्या कौशल्याने केला असल्याने ही चित्रे अ‍ॅक्रॅलिक माध्यमातून काढल्याचाच भास होतो. समुद्रकिनारा असो वा नदी, तलावाचा किनारा, मावळणारा सूर्य, उगवणारे फूल, गर्द वनराई, वनराईतून वाट काढत दूर जाणारा रस्ता हा साराच आशय चित्रातून एक भावना मांडणारा आहे. शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या पण विधिवत अधिकृत शिक्षण न घेतलेल्या मनीषातार्इंनी त्यांचा अनुभव नेमकेपणाने चित्रात व्यक्त केला आहे. हे प्रदर्शन ३० आॅगस्टपर्यंत सर्व रसिकांसाठी रात्री ८ वाजेपर्यंत खुले आहे. याप्रसंगी प्रदर्शनाला ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, रघु नेवरे यांनी भेट दिली. त्यांनी या सर्व चित्रांची प्रशंसा करून मनीषातार्इंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)