शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

वर्षभरात उचलला, त्यापेक्षा जास्त कचरा नागपुरात होतोय जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 07:00 IST

waste Nagpur news २२ हेक्टर जमिनीवर डम्प करण्यात आलेल्या १० लाख मे. टन कचऱ्यापैकी २ लाख मे. टन कचऱ्याची विल्हेवाट वर्षभरात लावण्यात आली. मात्र खेदाची बाब अशी की, जेवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली त्यापेक्षाही जास्त कचरा वर्षभरातच नागपुरात जमा झाला आहे.

ठळक मुद्देभांडेवाडी डम्पिंग यार्डच्या कचरामुक्तीचा संकल्प ठरतोय दिवास्वप्नरोज करावा लागतो ५०० मे. टन डंप कशी मिळणार कचरामुक्ती ?

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भांडेवाडी कचरा डम्पिंग यार्डाला येत्या तीन वर्षात कचरामुक्त करण्याचा आराखडा महानगर पालिकेने आखला आहे. २२ हेक्टर जमिनीवर डम्प करण्यात आलेल्या १० लाख मे. टन कचऱ्यापैकी २ लाख मे. टन कचऱ्याची विल्हेवाट वर्षभरात लावण्यात आली. मात्र खेदाची बाब अशी की, जेवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली त्यापेक्षाही जास्त कचरा वर्षभरातच जमा झाला आहे. कचऱ्याची पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) करण्याची सुविधा नसल्याने दररोज ५०० टन कचरा डम्प करावा लागतो. कचऱ्याची १०० टक्के विल्हेवाट लागत नसल्याने नागपूरला स्वच्छतेच्या रॅंकिंगमध्ये टॉप टेनमध्ये स्थान मिळणे कठीण दिसायला लागले आहे.

नागपूर शहरात दररोज १ हजार मेट्रिक टन कचरा संकलित होतो. यातील २०० मे.टन कचऱ्याच्या रिसायकलिंगची प्रक्रिया हंजर कंपनीकडून केली जाते. या कचऱ्यापासून खत आणि आरडीएफ तयार केले जाते. खताची विक्री आरसीएफलाच केली जाते. २०० टन ओल्या कचऱ्यावर रिसायकलिंग प्रक्रीया करून ४० दिवसात त्याचे खत तयार केले जाते. तर कचरा वेचणारी माणसे ५० टनांच्या जवळपास कोरडा कचरा उचलून नेतात. यातून त्यांना चांगली कमाई होते. नागपूर मनपाला ५०० टन कचरा डम्प केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

...कोरडा कचरा वेचण्यासाठी २८३ जणांना परवानगी

मनपाच्या भांडेवाडी यार्डमध्ये कोरडा कचरा वेचण्यासाठी २८३ कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना मनपाच्या आरोग्य विभागाने अधिकृतपणे नेमले आहे. ते दररोज येऊन प्रक्रिया करता येण्यासारखा कचरा उचलतात. त्यांना यातून चांगली कमाई होते. त्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जाते. ...

१०० टक्के कचरा उचलण्यासाठी प्रयत्न

मनपाचे उपायुक्त (घनकचरा) डॉ. प्रदीप दासरवार म्हणाले, कचरा प्रक्रियेची पद्धत अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. १०० टक्के कचरा उचलण्यासाठी एक योजना तयार केली आहे. त्याला मंजुरी मिळताच अंमलबजावणी केली जाईल.

टॅग्स :dumpingकचरा