शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

Phubbing... मोबाईलच्या विळख्यातून सोडवण्यासाठी तयार केलेला नवा शब्द..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 10:46 IST

Phubbing (फबिंग) हा शब्द तुम्ही ऐकला आहे काय..?.. नाही..? मग एक नवा शब्द तुमची वाट पाहतो आहे...

ठळक मुद्दे180 देशात वापरला जातो

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: Phubbing (फबिंग) हा शब्द तुम्ही ऐकला आहे काय..?.. नाही..? मग एक नवा शब्द तुमची वाट पाहतो आहे...२००७ मध्ये जेव्हा स्मार्टफोन या भूतलावर अवतरले तेव्हा ते २१ व्या शतकातला एक नवा प्रश्न म्हणून समोर येतील असे कुणालाही वाटले नव्हते. मोबाईलने जगाला जवळ तर आणले पण माणसाला माणसापासून दूर नेले. रेल्वेस्टेशन असो वा बसस्टँड, कॉलेज कट्टा असो वा रेस्टॉरंट सगळे आपापल्या मोबाईलमध्ये मग्न असतात. एखाद्या जोडीतला जोडीदार मोबाईलमध्ये व्यस्त असतो आणि दुसरा फक्त त्याच्याकडे पाहत राहतो किंवा एखाद्या ग्रूपमध्ये चारपाच जण मोबाईलवेडे असतात आणि एकदोघांना गप्पाच मारायच्या असतात तेव्हा एक तणावपूर्ण स्थिती निर्माण होत असते. हा एक प्रकारचा आजारच पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये दिसू लागला होता. मोबाईलच्या अतिवापरामुळे उपेक्षित, दुर्लक्षित, एकाकीपणाच्या जाणिवा तीव्र होत चालल्या होत्या. अशा स्थितीचे वर्णन कसे करावे? याला नेमका काय शब्द द्यावा.. प्रश्न पडला होता.आॅस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठात वेगवेगळ््या क्षेत्रातील दिग्गजांची एक मिटींग झाली. तीत Lexicologist (शब्दाच्या निर्मिती व वापराचे तज्ज्ञ), Phonetician (असे तज्ज्ञ जे शब्दांच्या स्वरांचा अभ्यास करतात व त्यांच्या लिप्यकरणास सहाय्य करतात.), वादविवादपटू, कवी, लेखक, शब्दकोडे तयार करणारे पटू सहभागी झाले होते. त्यांच्यासमोरचे आव्हान होते की, असा एक शब्द तयार करायचा की जो उच्चारला की, लोकांना त्यांचा मोबाईल खाली ठेवणे भाग पडेल आणि ते एकमेकांशी पुन्हा बोलू लागतील.जगभरातल्या विद्वानांनी भरलेल्या त्या सभागृहात मग नवा शब्द शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. वेगवेगळे शब्द समोर आले.. नबिंग, फफिंग, फ्रोलिंग, इंगिग, एक्सिंग...आणि अखेरीस... फबिंग.फबिंग शब्दावर सर्वसहमतीने शिक्कामोर्तब झाले. एका नव्या शब्दाचा अविष्कार झाला होता. मानवजातीच्या एकोप्यासाठी तयार झालेला तो शब्द होता. फबिंग हा शब्द इंग्रजी भाषेच्या देशांमध्ये सर्वात आधी लोकप्रिय झाला नंतर उर्वरित जगात विस्तारला.  ‘Stop phubbing’, ‘Are you a phubber?’ ‘He is a phubber; would you stop phubbing me.’ अशी वाक्ये बोलली जाऊ लागली. मोबाईलचा अतिवापर करण्यास विरोध केला जाऊ लागला. स्मार्टफोनमधील व्यस्ततेमुळे तुमच्या समोरच्या व्यक्तीला वाटत असलेल्या दुर्लक्षित भावनेला एक शब्द मिळाला आणि तिला त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही गवसला.भाषा नेहमी बदलत असते.. चला, तुम्हीही तुमची डिक्शनरी आता अपटेड करून घ्या..

टॅग्स :Mobileमोबाइल