शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिल निवडणुकीत मतपत्रिकांची फोटोग्राफी; नियमांना दाखविली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 10:03 IST

निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.

ठळक मुद्देवकिलांनीच काढले फोटोकोणाला मतदान केले हे स्पष्ट दिसते

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये राज्यघटनेतील गुप्त मतदानाच्या तरतुदीला धक्का पोहोचविणारी व लोकशाहीला तडा देणारी अशी घटना घडली आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. यावेळची निवडणूक विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्यामुळे कौन्सिल प्रत्येक गोष्टीविषयी सावधान होते. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यापूर्वी विधिज्ञ संघटनांच्या सदस्यांकडे ही जबाबदारी राहात होती. परंतु, वाद टाळण्यासाठी त्यांना निवडणूक व्यवस्थेपासून लांब ठेवण्यात आले होते. निवडणूक कक्षातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच, मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. वकिलांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक कर्मचाऱ्यांकडे जमा करायचे होते. परंतु, मतदार वकील व निवडणूक कर्मचाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली.नागपूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि जिल्हा व सत्र न्यायालयात मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे.छायाचित्रातील मतपत्रिकेत मतदानछायाचित्रातील मतपत्रिकेमध्ये संबंधित वकिलाने जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष सुदीप जयस्वाल (नागपूर) यांना पहिल्या पसंतीचे, अ‍ॅड. शाहेनशाह शाहनवाज काझी (औरंगाबाद) यांना सोळाव्या पसंतीचे तर, अ‍ॅड. सुनील लाचरवार (नागपूर) यांना बाराव्या पसंतीचे मत दिले असल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारे अनेक वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेची फोटोग्राफी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

चौकशी केली जाईलवकील मतदारांना मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना मतदार वकील मतदान कक्षात मोबाईल घेऊन गेले असतील तर, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. चौकशीनंतर हे प्रकरण न्यायाधिकरणासमक्ष सादर केले जाईल, अशी प्रतिक्रिया निवडणूक निरीक्षण समितीचे सदस्य अ‍ॅड. श्यामसुंदर दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक