शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबली

By admin | Updated: May 11, 2017 02:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ची ‘खैरात’ वाटल्या जाते, असे आरोप करण्यात यायचे.

नागपूर विद्यापीठ : यंदा केवळ १३८ उमेदवार नोंदणीसाठी पात्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ची ‘खैरात’ वाटल्या जाते, असे आरोप करण्यात यायचे. परंतु यंदापासून नियमावली कडक केल्यामुळे फारशी तयारी न करता नोंदणीसाठी सामोरे गेलेल्या उमेदवारांना फटका बसला आहे. ‘पेट’साठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी केवळ साडेतीन टक्के उमेदवारच प्रत्यक्ष नोंदणीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यापीठाने चाळणी प्रक्रिया नियमानुसार राबविल्यामुळे यंदा उमेदवारांची संख्या कमी झाली असली तरी दर्जा मात्र वाढला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. या सुधारणांसाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने नवे दिशानिर्देश तयार केले. यानुसारच ‘पीएचडी’ नोंदणीसाठी उमेदवारांची चाळणी करण्यात आली. यंदा ३७७१ उमेदवारांनी ‘पेट-१’ ही परीक्षा दिली. यापैकी ८९७ उमेदवार ‘पेट-२’साठी पात्र ठरले. यातील अवघे ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले. मागील दोन महिन्यांत ‘आरआरसी’च्या बैठका चालल्या. ‘आरआरसी’साठी २९१ उमेदवारांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी केली होती. यातील २३६ उमेदवार ‘आरआरसी’ला सामोरे गेले. यातील केवळ १३८ उमेदवारांना नोंदणीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. उर्वरित उमेदवारांना विविध नियमांची पूर्तता होत नसल्याने किंवा ‘सिनॉप्सिस’चे सादरीकरण प्रभावी नसल्यामुळे बाद करण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणे फार सोपे असल्याचा अनेकांमध्ये समज आहे. परंतु नव्या नियमांमुळे हा समज मोडीत निघणार आहे. आम्हाला ‘पीएचडी’ची संख्या नव्हे तर दर्जा वाढवायचा आहे, असे मत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. विज्ञान-तंत्रज्ञानमध्ये सर्वाधिक नोंदणी ‘आरआरसी’नंतर पात्र असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त प्रमाण विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेत आहे. या शाखेतील ७३३ उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरले आहेत. वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान विद्याशाखेतून ५१ उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरले आहेत.