शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेयामध्ये पीजीच्या २० जागा वाढल्या : ७२ जागांवर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:17 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ५६ वरून ७२ झाल्या. तब्बल २० जागा वाढविण्यात मेयो प्रशासनाला यश आले आहे. यात सर्वात जास्त औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या (मेडिसीन) सहा जागाचा समावेश आहे. ‘पीजी’ जागेत वाढ झाल्याने याचा फायदा विदर्भातील विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमेडिसीनच्या सहा, गायनीकच्या तीन जागेची पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ५६ वरून ७२ झाल्या. तब्बल २० जागा वाढविण्यात मेयो प्रशासनाला यश आले आहे. यात सर्वात जास्त औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या (मेडिसीन) सहा जागाचा समावेश आहे. ‘पीजी’ जागेत वाढ झाल्याने याचा फायदा विदर्भातील विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१८-१९ या वर्षात सर्व मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय विज्ञान परिषदेने (एमसीआय) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. यामुळे राज्यात ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात व जिथे आवश्यक पायाभूत सोयी, मनुष्यबळ व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत अशा सर्व महाविद्यालयांच्या जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मेयोमध्ये उपलब्ध सोईसुविधा व आवश्यक मनुष्यबळानुसार ‘पीजी’च्या २० जागा वाढविण्यात आला. यात कान, नाक, घसा विभागाची (ईएनटी) एक, मेडिसीन विभागाचा सहा, स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचा (गायनीक) तीन, नेत्ररोग विभागाचा दोन, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचा पाच, रेडिओलॉजी विभागाची एक, उर व क्षयरोग विभागाचा दोन जागा वाढविण्यात आल्या. यामुळे आता ‘पीजी’ जागांची संख्या ५६ वरून ७२ झाली आहे.आर्थाेपेडिक्स विभागाच्या चार जागा झाल्या कमीअस्थिव्यंगोपचार शास्त्र (आर्थाेपेडिक्स) विभागात प्राध्यापकाचे एक व सहयोगी प्राध्यापकाचे एक पद रिक्त असल्याने वाढलेल्या पाच जागांमधून चार जागा कमी करण्यात आल्या आहेत. आता या विभागाकडे पीजीच्या दोनच जागा आहेत.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर