शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल चोरीला बसणार आळा! पेट्रोल घोटाळा करणाऱ्यांवर मोक्का लावणार; गिरीश बापट यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:48 IST

पेट्रोल पंपावर मायक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी चोरी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) किंवा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत औचित्यावरील प्रश्नाच्या उत्तरात दिली.

ठळक मुद्देदोषी आढळलेल्या ३३ जणांना अटकमायक्रोचिप लावणाऱ्यांना आता कायद्याचा चाप

आॅनलाईन लोकमतनागपूर : पेट्रोल पंपावर मायक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी चोरी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) किंवा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत औचित्यावरील प्रश्नाच्या उत्तरात दिली. आ. संजय दत्त यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.उत्तर प्रदेशात पेट्रोल पंपांवर घालण्यात आलेल्या धाडीत पेट्रोल चोरीत ठाण्यातील एक व्यक्ती सहभागी असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रीतील १८६ पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. यात ९६ ठिकाणच्या मशीनमध्ये फेरबदल केल्याचे आढळून आले होते. ५९ पेट्रोप पंप जप्त करून त्यांची तपासणी करण्यात आली. या संदर्भात केंद्र सरकारला कळविल्यानंतर ८ पेट्रोलपंप बंद करण्यात आले तसेच ३३ जणांना अटक करण्यात आली. यात १४ पेट्रोल पंपचालक व मालकांचा यात समावेश आहे. परंतु त्यानंतर काही पेट्रोलपंप चालकांनी न्यायालयातून यावर स्थगनादेश मिळविला, अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली.पेट्रोल पंपांवर मायक्रोचिपच्या माध्यमातून कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसणूक होते. यात कोट्यवधींचा घोटाळा असल्याचा मुद्दा संजय दत्त यांनी औचित्याच्या माध्यमातून उपस्थित केला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Petrol Pumpपेट्रोल पंप